मुंबई: आज तब्बल 8 तास स्वतः शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. कल्याण, ठाणे, ईशान्य मुंबई, भंडारा, गोंदिया, जळगाव, रावेर, बुलढाणा, रायगड, मावळ, बारामती ह्या लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे आणि पक्षाचे इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती होती.
त्या वेब पोर्टल वरील मजकूर हटवा: लोकसभा निवडणुकीत 2019 साली आम्ही लढलेल्या मतदारसंघाचा मंगळवार आणि बुधवारी या दोन दिवसात, शरद पवार यांच्या उपस्थित मतदार संघातील विस्तृत माहिती घेऊन स्थानिक पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. खासदार यांचा मतदार संघ मोठा असतो. मतदारसंघात पक्षाची ताकद, महाविकास आघाडी सोबत गेल्याने काय फायदा होऊ शकतो, अनेक चर्चा बैठकीत झाल्याचे समजते. इंडिया टेल वेबसाईटबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांना भेटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाई करण्याबाबतची निर्देश दिले आहे. परंतु आमचे मत आहे की, तो मजकूर हटवला गेला पाहिजे. कठोर कारवाई झालीच पाहिजे. आज राहिलेल्या मतदार संघाचा आढावा घेतला.
सरकारने ठरविले तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही -विरोधी पक्ष नेते अजित पवार
लोकसभा विधानसभा एकत्र होण्याची शक्यता: पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार असल्याने, त्यापूर्वी राज्यात सर्वच पक्ष निवडणूक तयारीला लागले आहे. राष्ट्रवादी पक्षाची दुसऱ्या दिवशी देखील बैठक पार पडली. पुणे लोकसभा मतदारसंघ बाबत विचालेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, आम्ही आढावा घेत आहेत. काल आणि आज लोकसभेच्या परिस्थिती बाबत चर्चा होत आहे. महाविकास आघाडीचे नेते चर्चा करतील, जागावाटप बाबत निर्णय करतील. सध्या साधरण काय स्थिती आहे याचा आढावा घेतला जात आहे. सत्ताधाऱ्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. कदाचित शक्यता सीएम, डीसीएम यांना वरिष्ठ नेत्यांना सांगितले तर तसे होऊ शकते. सरकारने ठरविले तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता नाकारात येत नसल्याचे, विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. असे 1999 साली सहा महिने निवडणुकीला बाकी असताना लोकसभा आणि विधानसभा एकत्र निवडणुका झाल्या होत्या.
हेही वाचा -
- Sharad Pawar लोकसभेच्या तयारीसाठी शरद पवार अॅक्शन मोडवर राष्ट्रवादीकडून बैठकांचे सत्
- 2. Ajit Pawar on Seat Allocation कुठल्याही पक्षाकडे मोदींविरोधात लढण्यासाठी ताकद नसल्यानेअजित पवारांचे जागा वाटपाबाबत स्पष्ट वक्तव्य
- Ajit Pawar Solapur Tour अजित पवारांच्या स्वागताचा पूर्वसंध्येला ज्योतिबा गुंड यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी शिंदे गटात केला प्रवेश