मुंबई - सिंचन घोटाळ्याच्या सीबीआय आणि ईडीकडून चौकशीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केला आहे. सिंचन घोटाळ्यात मी आरोपी नसून, मंत्री म्हणून कर्तव्य बजावताना कोणत्याही भ्रष्ट अथवा बेकायदा कृत्यात सहभागी झालो नसल्याचे शपथपत्र उपमुख्यमंत्री पवार यांनी नागपूर खंडपीठात सादर केले आहे.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी नागपूर खंडपीठात अजित पवार यांच्या विरोधात खटला सुरू असून, त्यावर अजित पवार यांनी शपथपत्राच्या माध्यमातून आपली भूमिका न्यायालयासमोर मांडली आहे. मंत्री असताना आणि व्हीआयडीसीचा माजी अध्यक्ष या नात्याने सर्व नियमांचे पालन करूनच सार्वजनिक कर्तव्ये पार पाडली आहेत. सिंचन घोटाळ्याच्या कोणत्याही एफआयआर मध्ये अथवा आरोप पत्रामध्ये मला आरोपी केले नसल्याने मला आरोपी ठरविता येणार नसल्याचा उल्लेख या शपथपत्रात त्यांनी केला आहे.