महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकरी मोडला तर सरकारही मोडेल - अजित पवार - हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या लोकशाहीच्या संदर्भात राज्यपालांनी तातडीने मदतीसाठी हस्तक्षेप करावा. हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळवून द्यावी. शेतकऱ्यांचे वीज बील, पिक कर्ज माफ करावे, आदी मागण्या आम्ही या भेटीदरम्यान राज्यपालांकडे केल्या असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली.

अजित पवार

By

Published : Nov 5, 2019, 8:37 PM IST

मुंबई- परतीच्या पावसाने राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकरी हा आमचा पोशिंदा आहे. तो पोशिंदा मोडला तर हे सरकार पडेल, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राजभवन येथे माध्यमांशी बोलताना दिला.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या लोकशाहीच्या संदर्भात राज्यपालांनी तातडीने मदतीसाठी हस्तक्षेप करावा. हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळवून द्यावी. शेतकर्यांचे वीज बील, पिक कर्ज माफ करावे, आदी मागण्या आम्ही या भेटीदरम्यान राज्यपालांकडे केल्या असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली.

अजित पवार, नेते, राष्ट्रवादी

हेही वाचा - अवकाळी पॅकेजही ठरणार बोलाची कढी अन् बोलाचा भात

राज्यपालांची भेट घेतलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात छगन भुजबळ, नवाब मलिक, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, धिरज देशमुख, शरद रणपिसे, हुस्नबानू खालीफे उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, की राज्यात दीड कोटी एकरहून अधिक शेती पिकांचे नुकसान झाले आहे. हे आम्ही राज्यपालांना त्यांना लक्षात आणून दिले. झालेल्या नुकसानीचा विचार करता 25 हजार कोटीची रक्कम मिळाली पाहिजे. अजून पंचनामे सुरू आहेत. त्यासाठी 6 तारखेपर्यंत मुदत दिली ती आम्ही वाढवून मागितली आहे. सोयाबीन तूर, ज्वारी आदी खरीप पिकाचे अतोनात नुकासन झालेले आहे. त्यामुळे हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मिळाली पाहिजे, अशी आम्ही मागणी केली आहे.

हेही वाचा - 'देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री, महायुती करणार सत्ता स्थापन'

शेतकऱ्यांना लवकर मदत मिळत नाही, म्हणून राज्यात आत्महत्याचे प्रमाण वाढलेले असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशात सत्ता स्थापन करण्यासाठी खेळ सुरू आहे. बहुमत मिळूनही हे लोक सत्ता स्थापन करत नाहीत, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, याचे त्यांना काहीही पडले नाही. त्यामुळे तुम्ही हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी आपण राज्यपालांकडे केली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांसोबतच मच्छिमारांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यांनाही मदत मिळाली पाहिजे, राज्यात नैसर्गिक परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नाही. सगळीकडे परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करावे, वीज बील माफ करावे, आणि तातडीने करावेत, असे निवेदन आम्ही राज्यपालांना दिले आहे. आता जी मदत जाहीर केली आहे, ती द्यावी, आणि केंद्राकडून अधिक मदत मिळवून द्यावी.

द्राक्षांच्या संत्र्याच्या बागा लोकांनी तोडून टाकल्या आहेत. काहीही शिल्लक राहिले नाही. त्यामुळे राज्यात परतीच्या पावसाचे त्वरित पंचनामे करावेत, त्यासोबत पशुधन आणि घरांचे नुकसान झालेले आहे, त्यासाठी मदत मिळावी. लोकांना बियाणे आणि खते दिली पाहिजे, हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत मिळावी म्हणून आम्ही मागणी केली असल्याचे पवार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details