महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवारांची साडे तीन वाजता पत्रकार परिषद, पवार कुटुंबीयात कोणताही वाद नाही - शरद पवार - ajit pawar meet with sharad pawar

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार हे सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत., अजित पवारांच्या राजीनाम्यावर ते स्वतः बोलतील आणि पवार कुटुंबीयांत कोणताही वाद नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे...

थोड्याच वेळात पवार काका-पुतण्यांची होणार भेट

By

Published : Sep 28, 2019, 12:16 PM IST

Updated : Sep 28, 2019, 3:34 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी आज (शनिवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांचे निवासस्थानी भेट घेतली. राजीनामा आणि उतर अनेक बाबींवर दोघांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली. या चर्चेनंतर अजित पवार हे सायंकाळी साडे तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

पवार कुटुंबीयात कोणताही वाद नाही, राजीनाम्याचे कारण अजित पवारांच्या तोंडून ऐका - शरद पवार

अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील बैठक संपल्यानंतर, अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या निवस्थानी निघून गेले. तर नंतर शरद पवार यांनी पत्रकारांना थोडक्यात प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयात कोणताही वाद नाही असे म्हटले आहे, तसेच राजीनाम्याचे कारण अजित पवारांच्या तोंडूनच सर्वांनी ऐका, असेही ते म्हटले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आपल्या विधीमंडळ पदाचा राजीनामा दिला. मात्र यानंतर राजकीय वर्तुळावर त्याच्या अनेक प्रतिक्रीया उमटल्या होत्या. शरद पवार हे आज शनिवारी सकाळीच पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले. तसेच राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अजित पवार यांची भेट घेतली., यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.

अजित पवारांची साडे तीन वाजता पत्रकार परिषद, पवार कुटुंबीयात कोणताही वाद नाही - शरद पवार

कुटुंबीयानंतर अजित पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी आज (शनिवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांचे निवासस्थानी भेट घेतली. राजीनामा आणि उतर अनेक बाबींवर दोघांमध्ये दिर्घकाळ चर्चा झाली., यानंतर अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या घराकडे रवाना झाले असून, तिथे राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांसोबत बैठक घेणार आहे.

3:30 वाजता होणार पत्रकार परिषद

अजित पवार हे सुरूवातीला धनंजय मुंडे यांच्या घरी पत्रकार परिषद घेणार होते. मात्र आता मुंबईतील यशवंतराव चव्हाण गृहात ही बैठक होणार आहे.

पवार कुटुंबीयात बंद दाराआड झाली चर्चा

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. या चर्चेस सुप्रिया सुळे, अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार हे उपस्थित होते. तर राष्ट्रवादीचे इतर नेते निवासस्थानाच्या बाहेर होते. यामुळे पवार कुटुंबीयांच्यामध्ये बंददाराआड चर्चा झाली होती.

अजित पवार यांनी काल (शुक्रवार) तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. त्यांनी का राजीनामा दिला याबाबत अद्याप काहीही माहिती नाही. राजीनामाचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र, शिखर बँक घोटाळा प्रकरणात माझे नाव आल्यामुळे अस्वस्थ होऊन अजित पवारांनी राजीनामा दिल्याची शक्यता शरद पवार यांनी वर्तवली होती. तसेच त्यांनी राजीनामा देण्याआधी माझ्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नसल्याचे पवार म्हणाले होते.

Last Updated : Sep 28, 2019, 3:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details