मुंबई :मुख्यमंत्री पदाने सातत्याने हुलकावणी दिली असली तरी, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आतापर्यंत पाचवेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्यात नवा विक्रम प्रस्तापित केला आहे. सर्वात जास्तवेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
आत्तापर्यंतचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केव्हा घेतली शपथ ? :अजित पवार यांनी सर्वप्रथम १० नोव्हेंबर २०१० रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती ते . २५ सप्टेंबर २०१२ पर्यंत या पदावर कार्यरत होते. तर दुसऱ्यांदाही त्यांनी चव्हाण मुख्यमंत्री असताना शपथ घेतली. २५ ऑक्टोबर २०१२ रोजी ते २६ सप्टेंबर २०१४ पर्यंत ते उपमुख्यमंत्री होते.
शपथविधी गाजला :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांचा हा शपथविधी खूप गाजला. परंतु, अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुन्हा परत आणण्यात शरद पवार यशस्वी झाल्यानंतर पुरेशा संख्यबळाऐवजी फडणवीस यांनी आपल्या पदाचा २६ नोव्हेंबर २०१९ रोजी राजीनामा दिल्यामुळे अजित पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री पद औट घटकेचे ठरले .
उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार :राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ३० डिसेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु, राज्यात शिवसेनेतून शिंदे गट फुटून भाजपाने राज्यात सरकार स्थापन केले. २९ जून २०२२ रोजी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. आता शिंदे - फडणवीस सरकारमध्येही त्यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची पाचव्यांदा शपथ घेतली आहे. यापूर्वी छगन भुजबळ यांनी विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना दोन वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
हेही वाचा - NCP Political Crisisi : भावाच्या बंडानंतर बहिणीची पहिली प्रतिक्रिया; एकाच शब्दात दिले उत्तर