महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनुदान, शाळा-महाविद्यालय वाढीव पदांचा निर्णय मंत्रिमंडळात - अजित पवार - अजित पवार शरद पवार बैठक मुंबई

शाळा-महाविद्यालयांच्या वाढीव पदांचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शिक्षकांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितित आज सह्याद्री अतिथिगृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

Ajit Pawar held a meeting to solve the problems of teachers
अनुदान, शाळा-महाविद्यालय वाढीव पदांचा निर्णय मंत्रिमंडळात - अजित पवार

By

Published : Jun 22, 2020, 9:41 PM IST

Updated : Jun 22, 2020, 11:27 PM IST

मुंबई -शाळा-महाविद्यालयांच्या वाढीव पदांचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर केलेल्या निधीचं वितरण करणे. अंशत: अनुदानीत शाळांना प्रचलित धोरणाप्रमाणे टप्पा देण्याचा शासननिर्णय जारी करणे, कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांना अनुदानासह मान्यता देणे, अघोषीतला घोषित करुन अनुदान देणे आदी मुद्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचेही अजित पवार म्हणाले.

कोरोना संकटामुळे लागू टाळेबंदीचा फटका राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. शिक्षकांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथिगृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार बाळाराम पाटील, दत्रात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे, किशोर दराडे आदींनी उपस्थित केलेल्या शिक्षणविषयक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

राज्यातील शाळांचे अनुदान, वाढीव मान्यता व शिक्षकांच्या संदर्भात मागील सरकारने सप्टेंबर महिन्यात लागू केलेल्या अटी शिथिल करुन संबंधितांना मदत करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात यावा, असे ठरवण्यात आले. बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, तसेच वित्त व शालेय शिक्षण विभागाचे सचिव उपस्थित होते.

Last Updated : Jun 22, 2020, 11:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details