मुंबईAjit Pawar Group X Account Suspended :अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांना घेऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी अजित पवार यांना आपलं समर्थन दिलंय. तर काही आमदार अजूनही शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
नियम न पाळल्याने अकाउंट सस्पेंड : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले असून दोन्ही गटांचे सोशल मीडियावरील अकाउंट देखील वेगळे आहेत. यातल्या अजित पवार गटाच्या अकाऊंटवर कारवाई झाली (Ajit Pawar Group X Account) आहे. ट्विटर म्हणजेच एक्सकडून अजित पवार गटाचं अधिकृत अकाउंट सस्पेंड (X Account Suspended) करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यावर सध्या कोणतीही पोस्ट दिसत नाही. तरनियम न पाळल्याने हे अकाउंट सस्पेंड करण्यात आलं असल्याचं ट्विटरकडून (एक्स) सांगण्यात आलं आहे. तसा मेसेज देखील अजित पवार गटाच्या ट्विटर अकाऊंटवर दिसत आहे. मात्र, ट्विटरने नेमक्या कोणत्या नियमांचं उल्लघंन केल्याने ही कारवाई केली, याबाबतची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.