महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवारांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी;जयंत पाटील नवे पक्षनेते - NCP latest news

राज्यातील राजकीय भूकंपानंतर, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. पक्षाने ३० ऑक्टोबरला अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेते पदी निवड केली होती. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली. हे पक्षाच्या ध्येयधोरणांशी सुसंगत नाही, असे कारण देत हा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक

By

Published : Nov 23, 2019, 9:56 PM IST

मुंबई - अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत त्यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचा ठराव पारीत करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे विधीमंडळ नेतेपदाची सुत्रे सोपवण्यात आली आहेत. तसेच, पक्षाचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक

हेही वाचा -महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर नेत्यांचा 'शायराना अंदाज'...

राज्यातील राजकीय भूकंपानंतर, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. पक्षाने ३० ऑक्टोबरला अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेते पदी निवड केली होती. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली. हे पक्षाच्या ध्येयधोरणांशी सुसंगत नाही, असे कारण देत हा निर्णय घेण्यात आला. त्यासोबतच अजित पवार यांच्याकडे असलेले व्हिप बजावण्याचे अधिकारदेखील रद्द करण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details