मुंबई - राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी आज (सोमवार) निवड झाली. विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होताच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांच्या नावाची घोषणा केली.
विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी अजित पवारांची निवड - विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी अजित पवारांची निवड
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी निवड आज (सोमवार) निवड करण्यात आली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
अजित पवारांच्या आधी शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई विधानपरिषदचे सभागृह नेते होते. देसाई हे शांत स्वभावाचे आहेत. त्यामुळे विधान परिषदेत सरकारची बाजू आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्याची आवश्यकता होती. त्यानुसार आक्रमक आणि स्पष्टवक्ते असणाऱ्या अजित पवारांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. अजित पवारांच्या निवडीनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
विधान परिषदेत एकूण ७८ सदस्य आहे. २०२० मध्ये अनेक आमदारांचा कालावधी संपत आहे. सद्या विधान परिषदेते भाजपचे सर्वाधीक २२ सदस्य आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १५, काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी १३ आमदार आहेत. जून २०२० मध्ये राज्यपाल नियुक्त १२ आमदार महाविकास आघाडीतर्फे निवडले जाणार आहेत.