मुंबई : जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात अडचणी आलेले विरोधी पक्ष नेते अजित पवार लवकरात भाजपमध्ये जाणार असल्याचे ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले होते. यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात चौकशी सुरू आहे. अद्याप क्लीनचिट मिळालेली नाही. चुकीच्या पद्धतीने माझ्या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले जात असल्याचे पवार म्हणाले. मात्र, ज्यांनी भाजपमध्ये जाणार अशी, राळ उठवले आहे. त्या मोठ्या नेत्या आहेत. कोणाच्या सांगण्यावरून बोलल्या असतील. परंतु, माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तींबद्दल मी काय बोलणार, असा खोचक टोला अंजली दमानिया यांना लागावला.
नुकसानग्रस्तांना एक लाखाची मदत द्या :अवकाळीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत मिळवून द्यावी, यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आज भेटणार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या असलेल्या मागण्या संदर्भात राज्य सरकारला पत्र दिले आहे. त्यामध्ये शेती पिकांना 50 हजार, बागायती शेतकऱ्यांना एक लाख हेक्टरी मदत घ्यावी, अशी मुख्य मागणी आहे. बारमाही पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
आघाडीतील मतभेदावर चर्चा :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर अजित पवार यांनी, भूमिका मांडली. दोघेही खूप दिवस भेटले नसल्यामुळे ते भेटायला आले होते. संजय राऊत यावेळी सोबत होते. दोन तास दोघांमध्ये चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली असावी, असा अंदाज अजित पवार यांनी व्यक्त केला.