मुंबई - आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. मात्र, अजित पवार आपल्यासोबत नाहीत याची खंत आहे. त्यांची चूक माफ करुन त्यांना परत पक्षात घ्यावे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. शरद पवारांनी याबद्दल सकारात्मक विचार करावा असे ते म्हणाले.
अजित पवारांची चूक माफ करुन त्यांना पक्षात घ्यावे, छगन भुजबळांनी व्यक्त केली इच्छा - मुंबई
अजित पवार यांनी २३ नोव्हेंबरला पक्षाविरोधात बंड करुन भाजपसोबत चूल मांडली होती. पण, आज दुपारी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
![अजित पवारांची चूक माफ करुन त्यांना पक्षात घ्यावे, छगन भुजबळांनी व्यक्त केली इच्छा mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5186526-269-5186526-1574783250852.jpg)
छगन भुजबळ
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाच्या बांधणीत योगदान दिले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याविषयी आदर आहे. भाजपसोबत जाऊन त्यांनी चूक केली आहे. पण, त्यांच्या चुकीला पोटात घ्यावे अशी विनंती भुजबळांनी शरद पवारांना केली.
छगन भुजबळ यांनी सुरुवातीला बोलताना नव्या आघाडीचे स्वागत केले. येथे माझे जुने सहकारी भेटल्याचा मला आनंद आहे, असे भुजबळ मिश्किलपणे म्हणाले. मी ज्या ज्या पक्षात काम केले ते सर्व पक्ष आज एकत्र आले याचा मला आनंद आहे असे भुजबळ म्हणाले.
Last Updated : Nov 26, 2019, 11:11 PM IST