महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MVA Maha Morcha महामोर्चात अजित पवार कडाडले, महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कायदा करण्याची केली मागणी - अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस वाद

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari Controversial Statement ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यापाठोपाठ भाजपच्या अनेक नेत्यांनी महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वादग्रस्त वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चाचे MVA Maha Morcha In Mumbai ) आयोजन केले आहे. या महामोर्चात अजित पवारांनी ( Opposition Leader Ajit Pawar ) महापुरुषांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याविरोधात कायदा करण्याची मागणी केली.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 17, 2022, 4:45 PM IST

मुंबई - महापुरुषाबाबत विरोधात सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ( Winter Session ) यावर कायदा पारित करावा, यासाठी महाविकास आघाडीकडून ( Maha Vikas Aghadi ) मागणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी दिली आहे. आजच्या महाविकास आघाडीच्या हल्लाबोल महामोर्चा ( Maha Vikas Aghadi Maha Morcha ) भाषणादरम्यान अजित पवारांनी ही माहिती दिली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्यराज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari Controversial Statement ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज, तसेच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त केले. त्यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यामागे अशी वादग्रस्त वक्तव्य करायला सुरुवात केली. त्या विरोधातच महाविकास आघाडीच्या ( Maha Vikas Aghadi Maha Morcha ) सर्व पक्षांनी मिळून हा मोर्चा काढला आहे. हा मोर्चा महाराष्ट्र द्रोहीच्या मनात धडकी भरवणारा आहे. महापुरुषांच्या बाबत सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जातात. त्यानंतर माफी मागितली जाते, मात्र हे वक्तव्य कुठेच थांबताना दिसत नाहीत. या वादग्रस्त वक्तव्यांच्या विरोधात राज्यात अनेक शहरांमध्ये कडक बंद पाळण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यपालांना हटवले गेलेच पाहिजे, अशी मागणी आपल्या भाषणातून अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी केली आहे.

सीमा भागातील गावे आत्ताच कशी मागणी करू लागलेराज्यात या अगोदर अनेक वेळा महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद ( Maharashtra Karnataka Border Dispute ) झाला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Shiv Sena Chief Uddhav Thackeray ) यांच्या व्यतिरिक्त अनेक मुख्यमंत्री राज्यात झाले, मात्र सीमा भागातील गावांनी कधीही इतर राज्यात जाण्याबाबत वक्तव्य केले नव्हते. पण आता अचानक सीमा भागातील गावे इतर राज्यात जाण्याबाबत मागणी करू लागली. नेमके हे कसे झाले, हे सरकार आल्यानंतर अशा मागण्या का होऊ लागल्या? याबाबत देखील विचार झाला पाहिजे, असेही यावेळी आपल्या भाषणातून अजित पवार म्हणाले आहेत.

राज्य सरकारचे महाराष्ट्रावरचे प्रेम हे पूतना मावशीचे प्रेमराज्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद ( Maharashtra Karnataka Border Dispute ) उफाळला असताना, राज्य सरकार कर्नाटक बँकेत ( Karnataka Bank ) अधिकाऱ्यांचे खाते उघडण्याचा प्रयत्न करत आहे. यावरूनच राज्य सरकारचे महाराष्ट्रावरचे प्रेम हे पूतना मावशीचे प्रेम आहे, असा टोलाही अजित पवारांनी लगावला. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री ( Karnataka Chief Minister Basavaraj Bommai ) आपले ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे गृहमंत्र्याच्या बैठकीत सांगतात. मात्र ट्विटर हॅक कसा झाला याबाबत खुलासा देखील व्हायला हवा असे मतही अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details