मुंबई - विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा आग्रह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धरला आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे वडेट्टीवार नेमणूक करावी अशी मागणी करणार असल्याचे पवार म्हणाले. पवार यांच्या या भूमिकेमुळे उद्या विधानसभेत वडेट्टीवार यांच्या नावावर विरोधीपक्ष नेते म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवारांनी धरला वडेट्टीवार यांच्या नावाचा आग्रह
विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा आग्रह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धरला आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे वडेट्टीवार नेमणूक करावी अशी मागणी करणार असल्याचे पवार म्हणाले.
जित पवार आणि विजय वडेट्टीवार
वडेट्टीवार यांच्या नावासाठी आज विरोधीपक्षाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याला सर्वानुमते मंजुरीही देण्यात आली आहे. माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आज मंत्रिपदाची शपथ घेतल्याने विरोधीपक्ष नेतेपद हे विधानसभेत रिकामे होते. त्यावर काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच वडेट्टीवार यांचे नाव जाहीर केले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोधीपक्ष नेतेपदी वडेट्टीवार यांच्या नावाचा आग्रह धरला आहे.