मुंबई - काम न करता शासकीय तिजोरीतून निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून, त्यांना बडतर्फ करणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केले. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कृषी विभागाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. त्यावर अजित पवार बोलत होते.
काम न करता शासकीय निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार - अजित पवार
काम न करता शासकीय तिजोरीतून निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून, त्यांना बडतर्फ करणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केले.
अधिकाऱ्यांनी काम न करताच पैसे काढल्याचं फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी विधानसभेत मान्य केले. त्यावर हा सरकारच्या तिजोरीवर डाका आहे, असे सांगत याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला दिले. त्यांच्या निर्देशानुसार या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून बडतर्फीची कारवाई केली जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. जत जिल्हा सांगली तालुक्यातील कृषी विभागाच्या शेडनेट पॉलिहाऊस, नाला खोलीकरण व रुंदीकरण कामांमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला होता. यासंबंधीचा तारांकित प्रश्न अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला.