मुंबई - देवेंद्र फडणवीस हे उत्तम साहित्यीक होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी आता लेखक व्हावे, म्हणजे आम्हाला सुगीचे दिवस येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यांनी दिल्लीला जावे, कारण त्यांच्या ज्ञानाचा उपयोग तिथे होईल. त्यांनी जर हा निर्णय घेतला तर सर्वात जास्त आनंद हा सुधीर मुनगंटीवार यांना होईल, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.
'फडणवीस उत्तम साहित्यिक होऊ शकतात, तसे झाल्यास आम्हाला सुगीचे दिवस'
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर एक पुस्तक लिहले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' हेपुस्तक लिहले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह मंत्रीमंडळातील इतर मंत्री, आमदार उपस्थित होते.
Last Updated : Mar 4, 2020, 6:59 PM IST