मुंबई - महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या ४५ लाखांहून अधिक असल्याचे माहिती अधिकाराखाली स्पष्ट झाले आहे. राज्यात रोजगाराच्या नावानं बोंबाबोंब आहे. नवी गुंतवणूक नाही, नवे रोजगार नाहीत, अशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करतायेत? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या ४५ लाख, मुख्यमंत्री काय करतायेत? अजित पवारांचा सवाल - महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या
महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या ४५ लाखांहून अधिक असल्याचे माहिती अधिकाराखाली स्पष्ट झाले आहे. राज्यात रोजगाराच्या नावानं बोंबाबोंब आहे. नवी गुंतवणूक नाही, नवे रोजगार नाहीत, अशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करतायेत? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
अजित पवार
काँग्रेस प्रणित एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेने माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाला सरकारी कार्यालयाने उत्तर दिले. यामध्ये राज्यात ४५ लाखांहून अधिक बेरोजगार असल्याचे उघड झाले आहे. माहितीच्या अधिकारात कोशल्य विकास, राजगार व उद्योजगता संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अर्ज केला होता. त्यामध्ये राज्यातील नोंदणीकृत बेरोजगारांच्या संख्येची मागणी केली होती. त्याप्रमाणे सरकारी कार्यालयाने माहिती दिली आहे.