महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Political Crisis In NCP : शरद पवारांनी दिल्लीत बोलावलेली बैठक बेकायदेशीर, अजित पवारांचा दावा - आजची बैठक बेकायदेशीर

राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाचे रुपांतर आता कायदेशीर लढाईत होत आहे. नवी दिल्लीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांंनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यंत्री अजित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. शरद पवार घेत असलेली बैठक बेकायदेशीर असल्याचे अजित पवारांचे म्हणणे आहे.

shard  Pawar Meeting
shard Pawar Meeting

By

Published : Jul 6, 2023, 4:23 PM IST

Updated : Jul 6, 2023, 4:49 PM IST

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू झाली आहे. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही बैठक दिल्लीत बोलावली आहे. मात्र अजित पवारांच्या गटाने या बैठकीला विरोध केला आहे. मूळ राष्ट्रवादी पक्ष कोणता, हा वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे ही बैठक बेकायदेशीर असल्याचे अजित पवार म्हणाले. शरद पवारांना बैठक बोलावण्याचा अधिकार नाही. अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने शरद पवार अशी बैठक बोलवू शकत नाहीत, असे अजित पवार गटाने म्हटले आहे. त्यामुळे या बैठकीत घेतलेले निर्णय बेकायदेशीर असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी प्रेसनोट काढून ही माहिती दिली आहे. त्यामध्ये खालील मुद्दे नमूद आहेत.

आजची बैठक बेकायदेशीर :मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या दिल्लीतील सभेला अजित पवार यांच्या गटाने आक्षेप घेतला आहे. शरद पवारांना आज बैठक बोलावण्याचा अधिकार नाही. आजची बैठक बेकायदेशीर आहे. अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने शरद पवार अशी बैठक बोलवू शकत नाहीत. त्यामुळे या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे.

पक्ष आणि चिन्हावर दावा :उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा करत राष्ट्रवादीच्या ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. यावर आता शरद पवार यांनी आज दिल्लीत सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. यावर अजित पवार गटाने आक्षेप घेतला आहे. शरद पवार यांना बैठक बोलावण्याचा अधिकार नसल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे.

अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड : अजित पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अजित पवार यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे (ECI) याचिकाही दाखल केली आहे. त्यामुळे आम्हाला चिन्हासह पक्षाचे नाव देण्यात यावे अशी मागणी अजित पवारांनी केली आहे. खऱ्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व कोण करणार? या प्रश्नावरील वाद हा ECI च्या विशेष अधिकारक्षेत्रात आहे. त्यामुळे पक्षातील कोणत्याही व्यक्तीला राष्ट्रीय कार्यकारिणी/राष्ट्रीय कार्य समिती/राष्ट्रीय पदाधिकारी/राज्याची कोणतीही बैठक बोलावण्याचा अधिकार नाही. जोपर्यंत पक्षाध्यक्षांच्या वादावर ECI द्वारे निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत बैठक घेता येणार नसल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे.

तथाकथित बैठकीचे निर्णय बंधनकारक नाही :त्यामुळे आज, 06 जुलै रोजी होणार्‍या राष्ट्रीय कार्यकारिणी/राष्ट्रीय कार्यकारिणी/राष्ट्रीय पदाधिकारी/राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश पक्षाध्यक्षांच्या बैठकीला कोणतेही कायदेशीर मान्यता नाही. पुढे, तथाकथित राष्ट्रीय कार्यकारिणी/राष्ट्रीय कार्यसमिती/राष्ट्रीय पदाधिकारी/राज्य पक्षाध्यक्षांमध्ये घेतले जाणारे कोणतेही निर्णय वैध, कायदेशीर नसतील तसेच ते पक्षातील कोणावरही बंधनकारक नसतील असे अजित पवारांनी म्हटले आहे.

हेही वाचा- MNS Shivsena Alliance : ठाकरे बंधू एकत्र येणार? मनसेने टाळी दिल्याची चर्चा; मनसे नेते म्हणाले....

Last Updated : Jul 6, 2023, 4:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details