मुंबई:अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी त्यांच्या आजोबांच्या घरी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे थोरले बंधू अनंतराव पवार यांचे पुत्र. अजित पवारांचे लग्न सुनेत्रा पवार यांच्याशी झाले. त्यांना जय तसेच पार्थ ही दोन मुले आहेत. त्यांनी माध्यमिक शाळेचे शिक्षण देवळाली प्रवरा येथून घेतले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी अजित पवारांना मुंबईत यावे लागले. मुंबईत त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले. नंतर ते बारामतीत आले. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडून बारामतीला यावे लागले.
कडक स्वभाव अशी दादांची ओळख आहे अजित पवार यांची राजकीय कारकीर्द समाजकारण, सहकार क्षेत्र, शिक्षण, कला, क्रीडा यातून सुरू झाली. लोकसभा सदस्य, राज्यमंत्री, राज्य सहकारी बँकेचे प्रमुख, विधानसभा सदस्य, मंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अशा प्रदीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी विकासाला महत्त्व दिले. सर्वांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी बजावली.
अजित पवार यांनी 1982 मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, जेव्हा ते वयाच्या 20 च्या दशकात होते. साखर सहकारी संस्थेची त्यांची निवड ही त्यांची राजकारणातील पहिली पायरी होती. ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष 1991 मध्ये झाले. तब्बल 16 वर्षे ते या पदावर होते. ते 1991 मध्ये बारामती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले पण त्यांनी ही जागा काका शरद पवार यांच्यासाठी रिकामी केली त्यावेळी शरद पवार हे पी.व्ही. नरसिंह राव सरकार मधे भारताचे संरक्षण मंत्री होते.
रोखठोक भूमिकेमुळे ते ओळखले जातात खासदारकी सोडल्यानंतर ते विधानसभेवर निवडून आले आणि नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 पर्यंत कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री राहिले. 1995, पासून सलग 5 वेळा ते त्याच मतदारसंघातून पुन्हा निवडून आले. आजपर्यंत त्यांनी भूषवलेल्या महत्त्वाच्या पदांमध्ये कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा राज्यमंत्री, जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे, तीन वेळा) आणि उपमुख्यमंत्री (सप्टेंबर 29, 2012-25 सप्टेंबर 2014).
शरद पवार सुप्रिया सुळें सोबत अजित दादा अजित पवार हे महत्त्वाकांक्षी असून एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याचे त्याचे ध्येय आहे. आत्तापर्यंत ते नेहमीच राजकारणात होते. 2009 च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, या पदासाठी छगन भुजबळ यांची निवड करण्यात आली. पण नाटकीयरित्या डिसेंबर 2010 मध्ये त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि ते उपमुख्यमंत्री झाले. सप्टेंबर 2013 मध्ये त्यांचे नाव सिंचन घोटाळ्यात ओढले गेले आणि त्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावानंतर 7 डिसेंबर 2013 रोजी त्यांना क्लीन चिट देऊन उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आले.
17 जून 1991 ते 18 सप्टेंबर 1991. दरम्यान ते लोकसभा सदस्य होते. नंतर 1991 ते 1995 विधानसभा सदस्य, नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 राज्यमंत्री, जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन, 28 जून 1991 ते नोव्हेंबर 1992 राज्यमंत्री, कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा 1995 ते 1999, 1999 ते 2004 - विधानसभा सदस्य 27 ऑक्टोबर 1999 ते 25 डिसेंबर 2003 मंत्री, पाटबंधारे (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन 2004 ते 2009 - विधानसभा सदस्य 26 डिसेंबर 2003 ते 31 ऑक्टोबर 2004 - मंत्री, ग्रामविकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे महामंडळे).
दिलखुलास व्यक्तिमत्व अशीही त्यांची ओळख आहे नोव्हेंबर 2009 - विधानसभा सदस्य 9 नोव्हेंबर 2004 ते 7 नोव्हेंबर 2009 - मंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता 7 नोव्हेंबर 2009 ते 9 नोव्हेंबर 2010 मंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), ऊर्जा 11 नोव्हेंबर 2010 ते 29 सप्टेंबर 2012. 7 डिसेंबर 2012 ते आजपर्यंत - उपमुख्यमंत्री (वित्त आणि नियोजन, ऊर्जा) अशी त्यांची कारकिर्द आहे.
त्यांची बोलण्याची एक वेगळी शैली आहे सहकारी आणि इतर संस्थांमध्ये ही ते विविध पदावर कार्यरत आहेत. जसे की विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती, संचालक, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर,इंदापूर, संचालक, श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, लि., भवानीनगर, मालेगाव सहकारी साखर कारखाना आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे. संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मुंबई संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई, संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन.
ठोस भुमिका ते कायम घेत असतात इतकेवर्ष राजकारणात एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या अजीतदादांचे मुख्यमंत्री होण्याचे ध्येय आहे. आणि ते लपून राहिलेले नाही. राष्ट्रवादीचा मोठा गट फोडून ते भाजप आणि शिंदे गटाच्या सरकार मधे सहभागी झाले. त्यांच्या सोबत आलेल्या 9 दिग्गजांना मंत्री पदाची संधीही मिळाली. या सगळ्या घडामोडीत त्यांना मुख्यमंत्री पद मिळणार अशी चर्चा सुरु झाली काही कार्यकर्त्यांनी तर तर त्यांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्सही झळकावले. दादांची ही महत्वकांक्षा कधी पुर्ण होणार या कडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.