मुंबई - पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. मी कालही राष्ट्रवादीमध्ये होतो आणि आजही आहे, असेही पवार म्हणाले. विधीमंडळात आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पवार माध्यमांशी बोलत होते.
आमदारकीची शपथ घेतल्यानंतर काय म्हणाले अजित पवार? - अजित पवारांनी घेतली आमदारकीची शपथ
पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. मी कालही राष्ट्रवादीमध्ये होतो आणि आजही आहे, असेही पवार म्हणाले.
हेही वाचा -मी राष्ट्रवादीत होतो आणि राष्ट्रवादीतच राहणार; अजित पवारांनी ठणकावून सांगितले
सत्ता स्थापनेच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यपालांनी भाजपच्या कालिदास कोळंबकर यांना हंगामी सभापती पदाची शपथ दिली. त्यानंतर आज (बुधवार) विधीमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. यावेळी विधानभवनात नवनिर्वाचित आमदारांना विधीमंडळाच्या हंगामी अध्यक्षांनी शपथ दिली.