मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्ताने मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने काही ठिकाणी आकर्षक देखावेही उभारण्यात आले होते. असाच एक देखावा माटुंगा लेबर कॅम्प येथे साकारण्यात आला होता. या ठिकाणी सह्याद्री सामाजिक संस्थेने औरंगाबाद येथील अंजठा लेणीचा देखावा उभारला होता. हा देखावा उभारून सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे.
आंबेडकर जयंतीनिमित्त माटुंगा लेबर कॅम्पमध्ये साकारण्यात आला "अंजठा" लेणीचा देखावा - matunga
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्ताने मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने काही ठिकाणी आकर्षक देखावेही उभारण्यात आले होते.
महाराष्ट्रात अनेक लेण्या आहेत. मात्र, त्याचे योग्यप्रकारे संवर्धन होत नाही. प्रशासनाने या लेण्यांकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी हा देखावा साकारला आहे. माटुंगा लेबर कॅम्प हा आंबेडकरी बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या विभागात आंबेडकर जयंतीची वेगळीच धूम असते. रंगरबेरंगी रोषणाई, मिरवणुका, लाऊड स्पीकर यांनी वातावरण बहरलेले असते. यातच सामाजिक लेणी संवर्धनाचा संदेश या संस्थेने दिल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
संस्थेच्या माध्यमातून आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी विविध देखावे साकारली जातात. मागील वर्षी 'शिका. संघर्ष करा संघटित व्हा' या बोधवाक्यावर देखावा साकारण्यात आला होता. आम्हाला महाराष्ट्र सरकारला एक संदेश द्यायचा होता. आपल्या महाराष्ट्रातील अनेक लेण्या आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. लेण्याच्या माध्यमातून आपल्याला पुरातन काळातल्या वास्तू जोपासता येतात. महाराष्ट्र सरकारने त्यांचे जतन करावे. यासाठी आम्ही हा देखावा उभारला आहे, अशी माहिती संस्थेचे किशोर तोरणे यांनी दिली.