मुंबई : एअर इंडिया आता दिल्ली आणि चेन्नई, हैद्राबाद आणि बंगळुरू तसेच मुंबई ते चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू दरम्यानची विमानसेवा वाढवणार आहे. यामुळे एअर इंडियाचे नेटवर्क आणखी बळकट होणार आहे. सद्य:स्थितीमध्ये तीन स्टेशनस भुवनेश्वर (बीबीआय), बाडडोगरा (आयएसवी) आणि सुरत (एसटीव्ही) आता एअर इंडियाऐवजी एअर एशिया इंडिया म्हणून सेवा देणार आहे. दिल्ली-विशाखापट्टणम आणि मुंबई- लखनौ कामकाज एअर इंडियाद्वारे हाताळले जाणार आहेत.
एअर एशिया इंडिया म्हणून सेवा देणार : एअर इंडिया दिल्ली, मुंबई ते अहमदाबाद (एएमडी), कोचीन (सीओके), त्रिवेंद्रम (टीआरही), विशाखापट्टणम (कीटीझेड) आणि नागपूर (एनएजी) येथील सेवा वाढवली जाणार आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी तसेच या दोन्ही महानगरांतून दिली जाणारी लांब पल्ल्याची आंतरराष्ट्रीय विमानसेवा चांगली होणार आहे. त्याशिवाय एयर इंडिया दिल्ली आणि चेन्नई, हैद्राबाद आणि बेंगळुरू तसेच मुंबई ते चेन्नई, कोलकाता आणि बेंगळुरूदरम्यानची विमानसेवा वाढवणार आहे.
आंतरराष्ट्रीय नेटवर्कही विस्तारता येईल : एअर एशिया इंडियाचे संपादन आणि एअर इंडियाची सध्या सुरू असलेली पुनर्बांधणी व विस्तार यांसह समूहाचे फ्लाइट नेटवर्क विस्तारण्याची चांगली संधी आम्हाला मिळाली आहे. विशेषतः यामुळे आम्हाला मार्गांची त्यांच्यासाठी जास्त सुसंगत असलेल्या एअरलाइन्स बिझनेस मॉडेलशी सांगड घालणे शक्य झाले आहे. लक्झरी प्रवासाचे जास्त प्रमाण असलेल्या बाजारपेठांमध्ये कमी किमतीची विमानसेवा देणे आता आम्हाला शक्य झाले आहे.