मुंबई :भारताच्या ७४ प्रजासत्ताक दिनानिमित्त एअर इंडियाच्या संपूर्ण देशांतर्गत नेटवर्कमध्ये आकर्षक सूट देण्यात आली आहे. आज सकाळपासून सुरु करण्यात आलेली ही ऑफर २३ जानेवारी २०२३ पर्यंत सुरु राहील. एअर इंडियाच्या सर्व बुकिंग प्लॅटफॉर्म्सवर तसेच एअर इंडियाच्या अधिकृत ट्रॅव्हल एजंट्सकडे देखील या सेलचा लाभ घेता येईल. डिस्काउंटेड तिकिटे इकॉनॉमी क्लासमध्ये उपलब्ध असतील आणि १ फेब्रुवारी ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत भारतामध्ये संपूर्ण देशांतर्गत नेटवर्कमध्ये प्रवासासाठी लागू असतील.
तिकिटांवर सूट : फक्त १७०५ रुपयांच्या अतिशय कमी वन-वे शुल्कापासून तब्बल ४९ पेक्षा जास्त देशांतर्गत ठिकाणच्या तिकिटांवर सूट दिली जात आहे. कुटुंबासोबत सुट्टीवर जाणे असो किंवा कामासाठी प्रवास करणे असो, एअर इंडियाच्या विशाल देशांतर्गत नेटवर्कमध्ये आकर्षक सूट योजनेचा लाभ मिळवता येईल. अधिक माहितीसाठी वेबसाईटवर लॉगइन करावे असे आवाहन एअर इंडियाकडून करण्यात आले आहे.
एअर इंडिया बद्दल :जेआरडी टाटा यांनी यांनी एअर इंडियाच्या साहाय्याने भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात पदार्पण केले. 15 ऑक्टोबर 1932 रोजीच्या पहिल्या उड्डाणापासून, एअर इंडियाचे विस्तृत देशांतर्गत नेटवर्क आहे. यूएसए, कॅनडा, यूके, युरोप, सुदूर-पूर्व, दक्षिण-पूर्व आशियामध्ये नेटवर्क असलेली एक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमान कंपनी बनण्यासाठी तिचे पंख पसरले आहेत.एअर इंडिया स्टार अलायन्स या सर्वात मोठ्या जागतिक विमान कंपनीचा सदस्य आहे. सरकारी मालकीचा उपक्रम म्हणून 69 वर्षांनंतर, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे जानेवारी 2022 मध्ये टाटा समूहात पुन्हा स्वागत करण्यात आले. दिल्ली ते मुंबई ५०७५, चेन्नई ते दिल्ली ५८९५, बेंगळुरू ते मुंबई २३१९, दिल्ली ते उदयपूर ३६८०, दिल्ली ते गोवा ५६५६, दिल्ली ते पोर्ट ब्लेअर ८६९०, दिल्ली ते श्रीनगर ३७३०, अहमदाबाद ते मुंबई १८०६, गोवा ते मुंबई २८३०, दिमापूर ते गुवाहाटी १७८३ इतके शुल्क आकारण्यात आले आहे.
हेही वाचा : AIR India Urination Case विमानात लघवी प्रकरणी टाटा सन्सच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया म्हणाले आमचा प्रतिसाद