महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Central Railway Administration : शिर्डी ते विशाखापट्टणम साठी आता रेल्वेची आरामदायी सेवा - अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच जोडण्यात आली

देशातील मंदिरांपैकी शिर्डीच्या साई बाबांचे मंदिर हे भक्तांनी भेट देण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. इथे केवळ महाराष्ट्रातुनच नव्हे तर, देशाच्या कानाकोपऱ्यातुन (Shirdi to Visakhapatnam) भाविक दर्शनासाठी येतात. हीच बाब लक्षात घेऊन साईनगर शिर्डी विशाखापट्टणम एक्स्प्रेसमध्ये (Sainagar Shirdi Visakhapatnam Express) अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच जोडण्यात (air conditioning train service) आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने (Central Railway Administration) ही माहिती दिलेली आहे.

Central Railway Administration
शिर्डी ते विशाखापट्टणम रेल्वे

By

Published : Dec 27, 2022, 6:22 PM IST

मुंबई :शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनास जाण्यासाठी देशभरातून लाखो प्रवासी येतात. महाराष्ट्र राज्यातून तसेच राज्या बाहेरून देखील प्रवासी येतात. त्यामुळे आता दक्षिण भारतातून (Shirdi to Visakhapatnam) येणाऱ्या प्रवाशांसाठी खास आरामदायी सोय निर्माण केली गेली आहे. त्याकरीता साईनगर शिर्डी विशाखापट्टणम एक्स्प्रेसमध्ये (Sainagar Shirdi Visakhapatnam Express) अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच (air conditioning train service) जोडण्यात आली आहे.


मध्य रेल्वे द्वारा जारी :रेल्वेने 18504/18503 साईनगर शिर्डी - विशाखापट्टणम एक्सप्रेसमध्ये एक अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा साईनगर शिर्डी येथून दि. ३० डिसेंबर २०२२ आणि विशाखापट्टणम येथून २९ डिसेंबर २०२२ पासून सुरु होणार आहे.



वातानुकूलित डबे जोडले : महाराष्ट्राच्या बाहेरून जे प्रवासी शिर्डीला साईबाबाच्या दर्शनासाठी येतात. त्यांनी मध्य रेल्वे कडे अनेक वेळा मागणी केली होती की, त्यांना या ठिकाणाहून शिर्डी पर्यंत जायला वातानुकूलित डबा असायला हवा. दक्षिण भारतातून दोन दिवस प्रवास मोठा अवघड असतो. परिणाम गर्मीने प्रवासी हैराण होतात. त्यासाठीच सुविधा म्हणुन मध्य रेल्वेने खास अतिरिक्त वातानुकूलित डबे जोडलेले आहे.



कशी असेल रचना : सुधारित संरचना अशी असेल एक द्वितीय वातानुकूलित डबा असेल, ५ तृतीय वातानुकूलित डबे असतील , ७ शयनयान कक्ष असेल , तर ४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे असेल, ज्यामध्ये एक गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन असतील.



कोविड नियमांचे पालन करण्याचा सल्ला : प्रवाशांना विनंती केली जात आहे की, त्यांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांच्या प्रतीक्षा यादीतील तिकिटांची स्थिती तपासावी. या गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. असे मध्य रेल्वेच्या प्रशासनाने कळवले (Central Railway Administration) आहे. प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details