मुंबई- परतीच्या पावसाने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच त्यांना सरकारकडून मदत दिली जाणार असल्याची माहिती मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयीची चर्चा झाली असून सोमवारपासून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठीचा निधी वितरीत केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी आम्ही सरकारकडून 10 हजार कोटी रुपयांची पॅकेजची घोषणा केली आहे.त्यात 4 हजार 700 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आम्ही मंजूर केले आहेत यामुळे ही रक्कम त्यांना दिवाळीपूर्वीच दिली जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
मराठा आरक्षणावर चर्चा नाहीच मराठा आरक्षणावर चर्चाच नाही-
मराठा आरक्षणाच्या संदर्भात विचारना केली असता ते म्हणाले, बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा झाली नाही. तसेच राज्यात मंदिरे उघडण्याचा निर्णय मंदिर दिवाळी नंतर घेतला जाणार असून त्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले. तर वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूवीवर सरकारकडून चिंता व्यक्त केली जात असून दिल्लीत ज्या प्रमाणे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आपणही आता काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत सुरू होणाऱ्या लोकल सेवेच्या संदर्भात काही प्रमाणात राजकारण केले जात असल्याने हा विषय रखडला असून यासाठी केवळ भाजप जबाबदार असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
मग गोव्यात मंदिरे खुली का नाहीत?
भाजपाकडून मंदिरे खुली करण्यासाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनावरही त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपला देव कुठे आहे हे माहीत नाही, देव देवळात नाही माणसात आहे. पण भाजपने संतांची वाणी ऐकली नाही, ते आंदोलन करत राहिले, शिवाय भाजपची सत्ता असताना गोव्यात मंदिर का सुरू केली नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.