महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Prakash Ambedkar On BJP : लोकसभा निवडणुकांपूर्वी देशात अल्पसंख्यांक दलित महिलांवर अत्याचार होणार - प्रकाश आंबेडकर - भारतीय प्रजासत्ताक

आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी देशात द्वेषमूलक वातावरण तयार करण्यात येणार असून धार्मिक तेढ निर्माण केली जाणार आहे. दलित आदिवासी आणि अल्पसंख्यांक तसेच महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होतील असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. (Prakash Ambedkar On BJP)

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर

By

Published : Aug 5, 2023, 4:23 PM IST

Updated : Aug 5, 2023, 4:34 PM IST

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे निवडणूकपूर्व भाकीत केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जस जशा जवळ येतील तसे देशातील दलित आणि आदिवासी यांच्या विरोधातील अत्याचारात तसेच ओबीसी, मुस्लिम आणि महिला यांच्यावरील हिंसाचारात लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

देशातील वातावरण बिघडवले जाणार : 'द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापारातील सगळ्यात मोठ्या ठेकेदाराच्या 'प्ले बुक' मधून लिंचिंग, द्वेषयुक्त भाषणे, सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरवली जाण्याची शक्यता आहे. तसेच दंगली घडवल्या जाण्याची शक्यता असल्याचे ही आंबेडकर यांनी म्हटले आहे. भाजप-आरएसएसच्या गुंडांच्या मार्फत देशभरात द्वेष मूलक वातावरण राबवले जाईल.' असा घणाघाती आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

भाजप आरएसएसची योजना :भारतीय प्रजासत्ताकाला निवडणुकीतील फायद्यासाठी ' भयभीत प्रजासत्ताक ' मधे रुपांतरित करण्याची योजना असल्याचे त्यांनी म्हणले आहे. तसेच या दरम्यान काँग्रेस तटस्थ भूमिका घेईल आणि ‘मोहब्बत की दुकान’चे तुणतुणे वाजवत राहील असा टोलाही त्यांनी लगावला आहे. एकूणच देशातील परिस्थिती आणि कायदा व्यवस्था बिघडवली जाणार असल्याचे आंबेडकर यांनी तुमच्या माध्यमातून म्हटले आहे .

हिंदू-मुस्लीम वाद पण हवा: प्रकाश आंबेडकर यांनी मणिपूर येथे सुरु असलेल्या घटनेवरुनही भाजपावर नुकतीच टीका केली होती. मणिपूर येथे नागरिकांना अत्याधुनिक शस्त्रे कोणी पुरवली तेथे सामान्य लोकांच्या हातात अत्याधुनिक हत्यारे आली कशी? त्यांच्या हाता पर्यंत ही शस्त्रे पोहोचवण्यासाठी कोणत्या कोणत्या एजन्सी कार्यरत होत्या मणिपूरनंतर आता हरियाणामध्ये हिंसेची आग पोहोचलेली आहे. याचाच अर्थ केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला हिंदू-मुस्लीममध्ये भांडण लावायचे आहे हे स्पष्ट दिसते, असा आरोपही त्यांनी नुकताच केला होता.

औरंगजेब कबरीचा वाद :प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने एमआयएम सोबत युतीचा प्रयोग केला होता. त्या नंतर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी शिवसेनेशी जवळीक केली. दरम्यान राज्यात औरंगजेबाचे पोस्टर तसेच स्टेटस ठेवण्यावरुन वाद झाला. तेव्हा त्यांनी थेट औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. कालच विधिमंडळाच्या अधिवेशनात हा विषय निघाला तेव्हा त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट कोणाच्या कबरीला भेट देणे हा गुन्हा आहे का असा प्रश्नही विचारला होता.

Last Updated : Aug 5, 2023, 4:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details