मुंबई - शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणण्याची महत्त्वाकांक्षा घेऊन नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूरमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित पहिल्यांदाच ॲग्रोटेक केंद्र उभारण्यासाठी बुधवारी मुंबईत टाटा टेक्नोलॉजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.
नागपूर जिल्हा आणि परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत आणण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या पुरवठ्याच्या साखळीला अधिक चालना देण्याबरोबरच ग्रामीण कृषी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा अत्याधुनिक कृषी केंद्राची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करुन हे ॲग्रोटेक सेंटर मध्यस्थीचे काम करेल, असे मत डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.