मुंबई :राज्यात गेल्या तीन वर्षांपूर्वी पहाटेच्यावेळी विधानभवनात शपथविधी सोहळा पार पडला होता. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. यानंतर अवघ्या तीन दिवसात सरकार कोसळले होते. तेव्हापासूनच या शपथविधी सोहळ्याच्या चर्चा सुरू होती. दरम्यान, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधी सोहळ्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यावर आज कृषामंत्री अब्दुल सत्तार यांनी फडणवीस जे बोलतात ती काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे म्हटले आहे.
शरद पवारांनी केला विश्वासघात : अजित पवार यांच्यासोबत केलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतरच केला होता. मात्र, माझा दुसऱ्यांदा विश्वासघात झाला, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली होती. ते खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार या वादातून शिवसेना, भाजप युती फिसकटली होती. यातच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सोबत घेऊन पहाटे शपथविधी केला होता. मात्र, केवळ अडीच दिवस हे सरकार सत्तेत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढल्यामुळे हे सरकार पडले होते. मात्र, अजित पवार यांच्यासोबत केलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केला होता.
उद्धव ठाकरेंनी केलेली फसवणूक जिव्हारी :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याआधी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. मात्र, त्यानंतर काही राजकीय समीकरणे फिरली. अजित पवार यांनी आपला पाठिंबा काढला. त्यामुळे यावेळी दुसऱ्यांदा आपला विश्वासघात झाला, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली फसवणूक ही आपल्या जिव्हारी लागली होती, ती फसवणूक आपल्यासाठी मोठी होती, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले होते.