आग्रा : यमुना द्रुतगती महामार्गावर बस नाल्यात पडून २९ जणांचा मृत्यू
आज..आत्ता.. पहा सकाळी ९ पर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या - sharad pawar
आग्रा : यमुना द्रुतगती महामार्गावर बस नाल्यात पडून २९ जणांचा मृत्यू. नागपुरात ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, ७ जखमी. काँग्रेसने काढले आमदारांसाठी परिपत्रक, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग. शरद पवार आज तिवरे धरण दुर्घटनास्थळास देणार भेट. CRICKET WC : सेमीफायनल न खेळताच टीम इंडिया गाठणार फायनल?
आग्रा -उत्तर प्रदेशात आग्र्याजवळ यमुना द्रुतगती महामार्गावर बस नाल्यात पडून २९ जणांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या बसमध्ये ५७ प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे. वाचा सविस्तर...
नागपुरात ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, ७ जखमी
नागपूर - जिल्ह्यातील कुही परिसरात ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर...
काँग्रेसने काढले आमदारांसाठी परिपत्रक, कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग
बंगळुरु -कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी बंगळुरूमध्ये दाखल झाले आहेत. बंगळुरूमध्ये राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. ९ जुलैला काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे. यासाठी पक्षाने परिपत्रक काढले आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या सर्व आमदारांची बैठक कुमारस्वामी यांनी बोलावली आहे. जे आमदार या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर...
शरद पवार आज तिवरे धरण दुर्घटनास्थळास देणार भेट
रत्नागिरी -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज तिवरे धरण दुर्घटनास्थळास भेट देणार आहेत. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत. वाचा सविस्तर...
CRICKET WC : सेमीफायनल न खेळताच टीम इंडिया गाठणार फायनल?
मँचेस्टर -आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. उपांत्य फेरीसाठी कोणते चार संघ असणार याचे गणितही सुटले आहे. मंगळवारी भारत आणि न्यूझीलंड तर गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना रंगणार आहे. मंगळवारी होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी भारतीय आणि न्यूझीलंडचे चाहते कमालीचे आतूर झाले आहेत. पण, कदाचित त्यांना सामन्याचा आनंद घेता येऊ शकणार नाही. शिवाय, न्यूझीलंडच्या चाहत्यांचाही हिरमोड होऊ शकतो. कारण एका कारणामुळे भारतीय संघ हा सामना न खेळता थेट अंतिम सामन्यात जाऊ शकतो. वाचा सविस्तर...