मुंबई- सीएए व एनआरसीच्या विरोधामध्ये देशभरात विरोधाचे वातावरण उभे राहिले असून या कायदाला विरोध करण्यासाठी आज बहुजन मुक्ती मोर्चाने भारत बंदचे, आवाहन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी कांजुरमार्ग रेल्वे स्थानकावर रेल्वे अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी, वेळीच रेल्वे सुरक्षा बल व पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे रुळावरून हटवून वाहतूक सुरळीत केली.
भारत बंद : कांजुरमार्ग स्थानकावर लोकल रेल्वे अडविण्याचा प्रयत्न - कांजुरमार्ग रेल्वे स्थानक
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आंदोलनकर्त्यांनी कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर लोकल रेल्वे अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बहुजन मुक्ती मोर्चाकडून सीएए व एनाआरसी कायदा हा देशविरोधी व विशिष्ट धर्माला लक्ष्य करत असल्यामुळे हा कायदा केंद्र सरकारने परत घ्यावा, यासाठी आज देश बंद करण्याची हाक दिली होती. त्याचे पडसाद राज्यातील काही भागांमध्ये उमटत आहेत. आज सकाळीच 8 वाजेच्या सुमारास मध्य रेल्वेच्या कांजुरमार्ग रेल्वे स्थानकावर स्थानकावर रेल्वे स्थानकावर ठाण्याच्या दिशेला जाणाऱ्या लोकल रेल्वे अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आली. लोकल रेल्वे अडविल्यामुळे चाकरमान्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी रेल्वे सुरक्षा बल व पोलिसांनी हस्तक्षेप करत रेल्वे वाहतूक सुरळीत केली.
हेही वाचा - माघी गणेशोत्सव : डोंबिवलीत साकारला वास्तवदर्शी समुद्र मंथनाचा देखावा