महाराष्ट्र

maharashtra

शिवरायांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यपाल आणि भाजपविरोधात वातावरण तापले

By

Published : Dec 2, 2022, 11:12 AM IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केल्याने राज्यात तीव्र पडसाद उमटत ( Slogans against Governor Bhagat Singh Koshyari ) आहेत. शिवसेना ठाकरे गटानेही आक्रमक पवित्र घेतला असून आज ठीक ठिकाणी उग्र निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली.

Agitation against Governor
भाजपविरोधात वातावरण तापले

जालना :महापुरुषांबद्दलच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज जालना शहरात आमदार कैलास गोरंट्याल यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीत सत्ताधारी पक्ष सोडून सर्व पक्ष सामील झालेले आहेत तीन तारखेच्या छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक येथे सर्वपक्षीय शिवप्रेमी संघटना धरणे देण्यास बसणार आहेत अशी माहिती आज आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली. याचबरोबर नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन चालू न देण्याचा इशारा देखील कैलास गोरंट्याल यांनी दिला. जालन्यातील सर्वच शिवप्रेमींनी येत्या 7 डिसेंबर २०२२ रोजी जालना बंद पुकारला ( Chhatrapati Shivaji Maharaj Devotee Call Jalna Band ) आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर आज जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सर्व समन्वयक प्रमुख पदाधिकारी सहकारी यांची बैठक घेतली.

भाजपविरोधात वातावरण तापले

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केल्याने राज्यात तीव्र पडसाद उमटत ( Slogans against Governor Bhagat Singh Koshyari ) आहेत. शिवसेना ठाकरे गटानेही आक्रमक पवित्र घेतला असून आज ठीक ठिकाणी उग्र निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले त्यानंतर महाविकास आघाडीची तुलना औरंगजेबाशी तर शिंदेंच्या बंडाची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली. या वादग्रस्त विधानाचा राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ही मंगल प्रभात यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली मलबार हिल येथे आंदोलन केले. स्वाभिमानी छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि स्वाभिमानी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खूपसणारे 40 गद्दार कुठे? लोढा महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही समजता काय? असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.

कोल्हापूर :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करा असे म्हणत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ( Demand Case File Against Mangal Prabhat Lodha ) आहे. मात्र पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेत नसल्याने यावेळी येथे हाय व्होल्टेज ड्रामा देखील पहायला मिळाला. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात आज कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे रविकरण इंगवले यांच्यासह शिवसैनिक आले. यावेळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पीआय कटकधोंड यांना निवेदन देत जिल्हाप्रमुखानी तक्रार नोंद करण्याची मागणी केली. मात्र तक्रार नोंद न करता निवेदनाची पोच देण्यास पोलिसांनी तयारी दर्शवली यामुळे येथे शिवसैनिक आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली आणि पोलीस स्टेशन बाहेरच घोषणाबाजी करत मंगल प्रभात लोढा आणि पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

सातारा :भाजपाचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल हटावची मागणी करत पक्षाला घरचा आहेर दिला होता. त्या पाठोपाठ सांगलीचे खासदार देखील राज्यपाल हटावची मागणी करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून याबाबतीत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आले नाही. दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने याबाबतीत स्पष्टीकरण देताना समाजाच्या नोकर भरतीसह विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहचलो असता, त्याठिकाणी खासदार संजयकाका पाटील देखील उपस्थित (Presence of Sanjaykaka Patil ) होते. त्यावेळी आम्ही समाजाच्यावतीने देण्यात येणारे निवेदन देण्यासाठी विनंती केली. त्यानुसार संजयकाका पाटील आले, मात्र प्रत्यक्षात त्यांना निवेदनामध्ये काय आहे. याची कल्पना नव्हती, त्यामुळे संजयकाका पाटील यांचा प्रत्यक्ष काही संबंध नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजय पाटील यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details