मुंबई - रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरपर्यंतचा परिसर फेरीवालामुक्त करण्याचा महापालिकेचा मनसुबा धुळीस मिळताना दिसत आहे. दादर पश्चिम येथे पालिकेने लावलेले 'ना फेरीवाला क्षेत्र' फलक फक्त नावापुरते उरले असून फेरीवाल्यांनी मात्र 'जैसे थे' परिस्थिती केली आहे. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना गर्दीतून वाट काढतच चालावे लागत आहे. महापालिकेचे फलक असूनसुद्धा फेरीवाल्यांची विक्री अजून सुरूच आहे.
हेही वाचा - वांद्र्यात शिक्षणमंत्री शेलार यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसाठी डिजिटल ग्रंथालयाचे लोकार्पण
मुंबई पालिकेकडून फेरीवाल्यांवर अधूनमधून कारवाई केली जात आहे. मात्र, तरीही पुन्हा पुन्हा तेच चित्र पाहायला मिळत आहे. पालिकेने फेरीवाला धोरणाबाबत ठोस कार्यवाही केली नसल्याने रस्त्यावर अतिक्रमण होत असून, त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. पालिकेच्या उपाययोजनाही तुटपुंज्या असल्याने अशी परिस्थिती तयार होत असल्याचे दिसत आहे.