मनमाडमध्ये घरातील टाकीतूनच पाण्याची चोरी; तक्रार घेण्यास पोलिसांचा नकार, असे दिले कारण
नाशिक - घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग, अशा घटना मनमाड शहराला काही नवीन नाहीत. मात्र, काही दिवसांपासून मनमाड शहर आणि परिसरात पाण्याच्या चोरीची घटना घडली आहे. मागील दोन दिवसांत घरातील पाण्याच्या टाकीतून चक्क ३०० लिटर पाण्याची चोरी झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर
'संरक्षणतज्ज्ञ' मोदींनी विमाने कोण बनवू शकतो हे स्वतःच ठरवले, प्रियांका गांधींचा टोला
इंदौर - काँग्रेस उत्तर प्रदेश पूर्वच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'ढगाळ वातावरण आणि रडार' यांवरील वक्तव्यानंतर त्यांना 'संरक्षण तज्ज्ञ' म्हणत टोला लगावला आहे. त्यांनी मध्य प्रदेशात इंदौर येथे झालेल्या 'रोड शो'मध्ये मोदींवर निशाणा साधला. मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही त्यांच्यासोबत होते.वाचा सविस्तर
नरेंद्र मोदींच्या 'रडार' विधानावर उर्मिला मातोंडकरने लगावला टोला, म्हणाली....
मुंबई - सध्या देशभरात निवडणूकांचे घमासान सुरू आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीकासत्रांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. बॉलिवूडचेही बरेचसे कलाकार राजकीय क्षेत्रात उतरले आहेत. यामध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बरीच चर्चेत आहे. उर्मिला मातोंडकरने अलिकडेच नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानावर नाव न घेता निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर
दीपक केसरकरांचे खंदे समर्थक बबन साळगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर ? विधानसभा उमेदवारीची चर्चा
सिंधुदुर्ग - सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना राष्ट्रवादीकडून विधानसभा उमेदवारीची ऑफर असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. साळगावकर हे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे केसरकरांना मात देण्यासाठी राष्ट्रवादी ही खेळी खेळणार असल्याची राजकीय गोटात चर्चा आहे. तर या खेळीचा राणेंच्या स्वाभिमानालाही फायदा होऊ शकतो. वाचा सविस्तर
पियुष गोयल यांच्या 'त्या' टीकेवर रितेश देशमुखचं सडेतोड उत्तर
मुंबई - केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भाजप नेते पियुष गोयल यांनी विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या टीकेनंतर रितेश देशमुखने सोशल मीडियाद्वारे सडेतोड उत्तर दिले आहे. विलासरावांनी रितेश देशमुखला सिनेसृष्टीत काम मिळावे म्हणून एका दिग्दर्शकाची ताज हॉटेलमध्ये भेट घेतली होती. २६/११ च्या हल्ल्यादरम्यान ते त्या दिग्दर्शकाला घेऊन ताजमध्ये गेले होते, अशी टीका पियुष गोयल यांनी केली होती. वाचा सविस्तर