महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता.. दुपारी २ पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर - Afternoon NEWS

टाईम्स मासिकाच्या कव्हर फोटोवर पंतप्रधान मोदी नकारात्मकतेसाठी झळकले आहेत, तर दुसरीकडे मुंबईत काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. नागपुरात पोलिसांच्या गाडीत कुख्यात गुंडाने टिक-टॉक चा व्हिडीओ बनवला, तर अमरावतीमधल्या भाविकांच्या गाडीला उत्तरप्रदेशमध्ये अपघात झाला. शिवाय गडचिरोली नक्षली हल्ल्याला जबाबरदार म्हणून शैलेश काळे यांना देशद्रोहाची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

महत्त्वाच्या घडामोडी

By

Published : May 10, 2019, 2:08 PM IST

टाईमच्या 'कव्हर'वर पंतप्रधान; दुफळी निर्माण करणारा भारतातील एकमेव नेता म्हणून मोदींचा उल्लेख
नवी दिल्ली - अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी झळकले आहेत. मात्र, यावेळी त्यांना सकारात्मक नव्हे, तर नकारात्मकतेसाठी टाईमच्या मुखपृष्ठावर स्थान मिळाले आहे. दुफळी निर्माण करणारा भारतातील एकमेव नेता म्हणून पंतप्रधान मोदींचा उल्लेख टाईम मासिकात करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर...

टिळक भवनमध्ये काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात, निवडणुकीच्या आढाव्यासह दुष्काळावर होणार चर्चा

मुंबई- लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची महत्त्वाची बैठक आज मुंबईतील टिळक येथे सुरू झाली आहे. या बैठकीत निवडणुकीचा आढावा आणि दुष्काळावर चर्चा होणार आहे. तसेच लवकरच येत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे चित्र काय असेल? त्या संदर्भात प्राथमिक चर्चा होणार आहे. त्यासाठीचा एक अहवाल केंद्रीय समितीकडे पाठवला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते आहे. वाचा सविस्तर...

पोलीस व्हॅनमध्ये कुख्यात गुंडाने बनवला टिक-टॉक व्हिडिओ, पोलीस दलात खळबळ
नागपूर- शहरातील कुख्यात गुंड सय्यद मोबिन अहमद याने पोलिसांच्या गाडीत बसून टिक-टॉक व्हिडिओ तयार केला आहे. त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावरदेखील शेअर केला. त्यामुळे सध्या नागपुरात या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मात्र, खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर...

अमरावतीतील भाविकांच्या बसचा उत्तर प्रदेशमध्ये अपघात, २६ जण जखमी
मिर्झापूर - अमरावतीमधील भाविकांच्या बसचा उत्तर प्रदेशमध्ये अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये २६ लोक जखमी झाले आहेत. मिर्झापूर येथील हलिया परिसरातील ड्रमंडगंज घाटात बसचा अपघात झाला. बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची माहिती भाविकांनी दिली. वाचा सविस्तर...

गडचिरोली नक्षली हल्ला : '१५ हुतात्मा जवानांच्या मृत्यूस एसडीपीओ शैलेश काळेच जबाबदार, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा'

गडचिरोली- गेल्या १ मे रोजी भूसुरुंग स्फोटात १५ जवानांना वीरमरण आले होते. या घटनेला कुरखेड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हुतात्मा जवान तौसीफ शेख यांचा भाऊ शेख आसिफ शरीफ यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाचा सविस्तर...

बातमी, सर्वांच्या आधी..
https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details