महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता... दुपारी २ पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर - ETV maharashtra

नागपुरात अधिवेशनाच्यावेळी निर्माण झालेल्या अडचणीमुळे यंदा पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईतच घेण्यात येणार आहे, तर दुसरीकडे सहाव्या टप्प्यातील उमेदवारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे शपथपत्रावरून स्पष्ट झाले आहे. ठाण्यात आदिवासी वसतीगृहात जेवणामध्ये पाल निघाली, तर नागपुरात मद्यधुंद चालकाने ४ दुचाकीस्वारांना उडवले आहे. शिवाय, बॉलीवूडचे 'अॅक्टिंग' गुरू रोशन तनेजा यांचे निधन झाले.

२ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी

By

Published : May 11, 2019, 2:03 PM IST

पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईतच, राज्यपाल कार्यालयाकडून अधिसूचना जारी
मुंबई - पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेऊन नवा पायंडा पाडणाऱ्या भाजप सरकारला पहिल्याच दिवशी पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे यंदाचे अधिवेशन पुन्हा मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १७ जूनपासून अधिवेशन भरविण्यात येणार असून राज्यपालांनी तशी अधिसूचनाही काढली आहे. तसेच पंरपरेनुसार हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार आहे. वाचा सविस्तर...

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील उमेदवारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे; 'हा' पक्ष आघाडीवर
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आता देशात उद्या सहाव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या टप्प्यात ७ राज्यातील ५९ लोकसभा मतदार संघांसाठी १२ मे रोजी मतदान होईल. यामध्ये एकूण ९७९ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार तब्बल १५ टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटीक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने या उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास केला. वाचा सविस्तर...

मुरबाडच्या आदिवासी वसतीगृहातील जेवणात निघाली पाल
ठाणे- मुरबाड येथील आदिवासी विकास विभागाच्या मुलांच्या वसतीगृहातील जेवणात मेलेली पाल निघाली आहे. त्यामुळे वसतीगृहात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. वाचा सविस्तर...

नागपुरात मद्यधुंद वाहनचालकाचा धुमाकूळ, ४ जणांना उडवले
नागपूर- शहरात भरधाव गाडी चालवत मद्यधुंद कारचालकाने रात्री १२ वाजण्याच्या सुमारास जवळपास ४ दुचाकीस्वारांना उडवले. यामध्ये चालकासह एकूण ४ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती जास्तच गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.वाचा सविस्तर...

बॉलिवूडचे 'अॅक्टिंग' गुरू रोशन तनेजा यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन
मुंबई - नसिरुद्दीन शहा, शबाना आझमी, अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, राकेश बेदी यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांना अभिनयाचे बाळकडू देणारे अॅक्टिंग गुरू रोशन तनेजा यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. गेले अनेक दिवसांपासून ते उपचार घेत होते. राहत्या घरीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडने एक सच्चा अभिनय शिक्षक गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी मिहिका, रोहित आणि राहुल ही दोन मुले, असा परिवार आहे. वाचा सविस्तर...

बातमी, सर्वांच्या आधी...

https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra

ABOUT THE AUTHOR

...view details