आंतरराष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळ विरोधात पत्नीची तक्रार, शारीरिक मानसिक छळाचा गुन्हा दाखल
नाशिक - रोइंगपटू दत्तू भोकनळ विरोधात पत्नीचा छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. भोकनळची पत्नी पोलीस दलात कार्यरत आहे. वाचा सविस्तर...
घरात खेळताना गळ्याभोवती ओढणीचा फास बसल्याने १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
औरंगाबाद - घरात खेळताना गळ्याभोवती ओढणीचा फास बसल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील उस्मानपुरा भागात गुरुवारी रात्री घडली. आरमान अजीज कुरेशी असे मृत मुलाचे नाव आहे. वाचा सविस्तर...
महात्मा गांधींचा मारेकरी देशभक्त? हे राम, प्रियंकांचा साध्वीवर निशाणा
नवी दिल्ली - साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी निशाणा साधला आहे. महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे देशभक्त होता, असे वादग्रस्त विधान साध्वी यांनी केले होते. आज त्यावरच प्रियंका यांनी 'महात्मा गांधींचा मारेकारी देशभक्त? हे राम' असे ट्विट केले आहे. वाचा सविस्तर...