महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...शनिवारी दुपारी २ पर्यंत महत्वाच्या घडामोडींवर एक नजर... - bulletin of ETV Bharat

मुंबईत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे, तर पुण्यात चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवल्याची घटना घडली आहे. बिग बॉस सिझन २ चे स्पर्धक अभिजीत बिचुकलेला आज सातारा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे. भारत आणि अफगाणिस्तानच्या संघात आज पहिल्यांदाच विश्वचषकात सामना होणार आहे. शिवाय नीती आयोगाने दुचाकीसह तीनचाकी ईलेक्ट्रिक करण्यासाठी ऑटो कंपन्यांना सूचना केल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी

By

Published : Jun 22, 2019, 2:46 PM IST

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू

मुंबई -भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित आहेत. या बैठकीला सुरूवात झाली आहे. वाचा सविस्तर...

चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवली; पुणे-सोलापूर महामार्गावरील घटना

पुणे- चोरट्यांनी चक्क स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम मशीन चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावर यवत येथे शुक्रवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर...

'बिग बॉस सीझन २' चे स्पर्धक अभिजीत बिचुकले यांची सत्र न्यायालयात हजेरी

सातारा - 'बिग बॉस मराठी सीझन २' चा स्पर्धक अभिजीत बिचुकले याला चेक बाऊन्स प्रकरणी आरे पोलिसांनी २१ जून रोजी अटक केली होती. आज (२२ जून) त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. बिग बॉसमध्ये आधीच चर्चेत आलेला बिचुकले या प्रकरणामुळे आणखी चर्चेत आला आहे. वाचा सविस्तर...

Cricket Wc : अफगाणिस्तानला लोळवण्यासाठी भारताची 'विराट'सेना सज्ज

साऊदम्पटन- भारत आणि अफगाणिस्तानच्या संघात आज पहिल्यांदाच विश्वचषकात सामना होणार आहे. अफगाणिस्तान संघाने आत्तापर्यंत पाच सामने खेळले असून या पाचही सामन्यात अफगाणिस्तान संघाला पराभवाची चव चाखावी लागली. दुसरीकडे भारतीय संघ प्रचंड लयीत आहे. त्यामुळे आज भारतीय संघ अफगाणिस्तानच्या संघाला लोळवण्यास सज्ज झाला आहे. हा सामना साऊदम्पटनच्या द रोज बाऊल मैदानावर दुपारी ३ वाजता खेळण्यात येणार आहे. वाचा सविस्तर...

...तर २०२५ नंतर फक्त ईलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकी रस्त्यावर धावणार

नवी दिल्ली- प्रदूषण आणि तेलइंधनाचे दर वाढल्याने त्रस्त आहात. कदाचित तुमची भविष्यात यातून सुटका होवू शकते. कारण नीती आयोगाने दुचाकीसह तीनचाकी ईलेक्ट्रिक करण्यासाठी ऑटो कंपन्यांना सूचना केल्या आहेत. त्यासाठी २०२५ ची अंतिम मुदत देण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. त्याबाबत नीती आयोगाने वाहन उत्पादक आणि ईलेक्ट्रिक वाहनांच्या स्टार्टअप कंपन्यांची शुक्रवारी बैठक घेतली. जर प्रदुषणाबाबत वाहन उद्योगाने पाऊल उचलले नाही तर, न्यायालय निर्णय घेईल, असा इशाराही नीती आयोगाने यावेळी कंपन्यांना दिला. वाचा सविस्तर...

*बातमी, सर्वांच्या आधी*
https://www.etvbharat.com/marathi/maharashtra

ABOUT THE AUTHOR

...view details