दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ७७.१० टक्के, कोकण विभागाची बाजी
मुंबई - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल ७७.१० टक्के लागला आहे. तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ९० टक्केपेक्षा जास्त टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २८,५१६ इतकी आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. वाचा सविस्तर...
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे मोदींना पत्र, व्यक्त केली अशी इच्छा
इस्लामाबाद- भारत आणि पाकिस्तानमधील मतभेद मिटवेत. यासाठी पाकिस्तान भारताशी चर्चा करू इच्छितो, असे पत्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. वाचा सविस्तर...
क्रिप्टोचलनात व्यवहार केल्यास १० वर्षाचा तुरुंगवास ; कायद्याच्या कच्च्या मसुद्यात प्रस्ताव
नवी दिल्ली - ऑनलाईन खरेदी विक्रीसाठी क्रिप्टोचलनाचा वापर केला जात आहे. मात्र, असा वापर करणे कायद्याने गुन्हा ठरणार आहे. क्रिप्टोचलन घेणे, विकणे अथवा त्याचा आर्थिक व्यवहार केल्यास १० वर्षाचा तुरुंगवास होवू शकतो. त्याबाबतचा प्रस्ताव कायद्याच्या कच्च्या मसुद्यात करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...
भारताचा युजवेंद्र चहल गोलंदाजी करताना घेतो 'या' खेळाचा आधार
लंडन - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 'द रोझ बाऊल' क्रिकेट मैदानावर रंगलेल्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवत विजयाचे खाते उघडले. रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर भारताला विजयाचे लक्ष गाठता आले. त्याने १४४ चेंडुमध्ये १२२ धावा केल्या. तर, भारताकडून पहिलाच वनडे विश्वचषक खेळणारा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आफ्रिकेच्या संघाला खिंडार पाडले होते. वाचा सविस्तर...
B'Day Spl: 'या' ५ घटनांनी बदललं शिल्पाचं आयुष्य, ही घटना ठरली टर्निंगपॉइंट
मुंबई- सौंदर्यतेचे निकष बदलत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज वाढदिवस आहे. शिल्पा आज बॉलिवूडची सर्वात फिटेस्ट अभिनेत्रीमध्ये गणली जाते. सुरुवातीला मॉडेल म्हणून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. शाहरुख आणि काजोलसोबत तिने 'बाजीगर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या आयुष्यात अनेक चढउतारांना ती सामोरी गेली. यात काही अशाही घटना आहेत ज्यांमुळे तिचे संपूर्ण आयुष्यच पालटले. तिच्या वाढदिवसानिमित्त एक नजर टाकूयात अशाच काही घटनांवर...वाचा सविस्तर...
बातमी, सर्वांच्या आधी
https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra