महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज... आत्ता... शुक्रवारी दुपारी २ पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर... - ETV Bharat

सोलापुरात जळत्या बसमध्ये चढून ६ युवकांनी १८ प्रवाशांचे प्राण वाचवले आहे, तर मुंबईत युवा क्रिकेटपटूची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शिवाय दुचाकीसह चारचाकीवरील विमा १६ दूनपासून महागणार आहे. तर हिंगोलीत मृग नक्षत्राच्या दिवशीच दमदार पावसाने हजेरी लावली आहे. एवढेच नाहीतर लातुरात एकजणाची ऑनलाईन दुचाकी मागवली असता त्याची फसवणूक झाली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी

By

Published : Jun 7, 2019, 2:02 PM IST

सोलापूरकरांनी घडवले माणुसकीचे दर्शन; जळत्या बसमध्ये चढून वाचवले १८ जणांचे प्राण

सोलापूर - एका जीवघेण्या प्रसंगात सोलापूरच्या ६ युवकांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. तेलंगणा राज्य परिवहनच्या बसचा अपघात झाल्यानंतर स्वतःचा जीव धोक्यात घालून १८ अपघातग्रस्तांचे प्राण या युवकांनी वाचवले आहेत. जळत्या बसमध्ये चढून प्राण वाचवणाऱ्या या युवकांचे सर्व नागरिकांडून कौतुक होत आहे. वाचा सविस्तर...

मुंबईत युवा क्रिकेटपटूची निर्घृण हत्या

मुंबई - भांडूपमध्ये गुरुवारी तीन अज्ञातांनी तीक्ष्ण शस्त्रांने केलेल्या हल्ल्यात स्थानिक युवा क्रिकेटपटूचा मृत्यू झाला आहे. राकेश अंबादास पवार असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. हल्ला हा पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. भांडूप पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. वाचा सविस्तर...

दुचाकीसह चारचाकीवरील विमाही १६ जूनपासून महागणार, असे असतील नवे दर

नवी दिल्ली- आरबीआयने गुरुवारी रेपो दरात कपात करून कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र, विम्याच्या हप्त्यात मोठी वाढ होत असल्याने दुचाकी आणि चारचाकीसाठी कर्ज घेणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. विमा क्षेत्र नियामक आयआरडीएआयने दुचाकीसह चारचाकीवरील तृतीय पक्षाच्या विम्याचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. विम्यांचा हप्ता २१ टक्क्यापर्यंत वाढणार असल्याने ग्राहकांना मोठी झळ सोसावी लागणार आहे. वाचा सविस्तर...

हिंगोलीत मृगनक्षत्राच्या दिवशीच पावसाची दमदार हजेरी; अनेक घरांचे नुकसान

हिंगोली - जिल्ह्यात ६ जूनच्या रात्रीपासून मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. मृगनक्षत्राच्या दिवशीही पहाटेपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून खरीप पेरणीपूर्व शेती मशागतीला वेग येणार आहे.वाचा सविस्तर...

'ओेएलएक्स'वरुन मागवली दुचाकी; पदरी पडली फक्त बनावट कागदपत्रे

लातूर- दिवसेंदिवस ऑनलाईनद्वारे वस्तू खरेदीवर सर्वांचाच भर आहे. विशेषतः तरुणाईला ही प्रक्रिया अधिक सोयीची असल्याचे वाटते. मात्र, लातुरात एका तरुणाला अशाच प्रकारे दुचाकी खरेदी करण्याच्या नादात तब्बल ४१ हजाराचा गंडा बसला आहे. 'ओएलएक्स' या ऑनलाईन साईटवरून त्याने दुचाकी मागवली. मात्र, पदरी केवळ दुचाकीची कागदपत्रे पडली असून त्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वाचा सविस्तर...

बातमी, सर्वांच्या आधी..
https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra

ABOUT THE AUTHOR

...view details