ईदच्या दिवशीही काश्मीरमध्ये धग कायम, दहशतवाद्यांनी महिलेला घातल्या गोळ्या
पुलवामा- जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून एका महिलेची हत्या केली आहे. तसेच एक युवकही या गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. आज पहाटे ही घटना घडली. वाचा सविस्तर...
हवाई दलाच्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले, पायलट आशीष तंवर यांचा मृत्यू
नवी दिल्ली- चीन सीमेजळील आसामच्या जोरहाट येथून सोमवारी (दि. ३ जून) अरूणाचलकडे उड्डाण केलेले हवाई दलाचे विमान क्षतिग्रस्त झाले होते. हे विमान शोधण्यात हवाई दलाला यश आले असून त्यातील २९ वर्षीय पायलट आशीष तंवर यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर...
मुंबईत शालिमार एक्सप्रेसमधून जिलेटीनच्या कांड्या जप्त?
मुंबई - शालिमार एक्सप्रेसमधून जिलेटीन सदृश्य कांड्या जप्त करण्यात आल्या आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवर गाडी उभी असताना लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. वाचा सविस्तर...
देशभरात ईद उत्सहात साजरी, मुस्लीम बांधवांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा
नवी दल्ली - देशभरात आज ईद उत्साहात साजरी केली जात आहे. ईदच्या मुहुर्तावर संपूर्ण देशातील मुस्लीम बांधवांनी एकत्र येत नमाज पठण केले. तसेच गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. वाचा सविस्तर...
CRICKET WORLDCUP : आली रे आली...आता आपली बारी आली, आज रंगणार भारताचा आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना
साऊदम्पटन- विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेची सुरुवात ३० मेपासून सुरुवात झाली असली तरी साऱ्या जगाचे लक्ष आज होणाऱ्या सामन्याकडे असणार आहे. कारण आज भारतीय संघ आपला सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेशी खेळणार आहे. हा सामना साउथॅप्टनच्या रोज बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळण्यात येणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता ही लढत होणार आहे. वाचा सविस्तर...
*बातमी, सर्वांच्या आधी*
https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra