राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर आमदारकीचा राजीनामा, पक्षात घुसमट होत असल्याचा केला आरोप
मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील आज विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला आहे. ते आता भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.वाचा सविस्तर...
मायावतींनी काढली 'सायकल'ची हवा, आगामी निवडणुका स्वबळावर लढणार
नवी दिल्ली - बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी समाजवादी पक्षाबरोबर असणारी युती तोडली आहे. बसप यापुढे पुढील निवडणुका स्वबळावर लढवणार, अशी माहिती मायावतींनी दिली. त्या पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. वाचा सविस्तर...
पोकलेनसाठी माहेरहून पैसे न आणल्याने विवाहितेचा खून? 'आधी दाबला गळा, मग दोरीला लटकवला मृतदेह'
बीड- पोकलेन घेण्यासाठी माहेरहून पैसे न आणल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेचा गळा आवळून खून केला, असा आरोप विवाहितेच्या आई-वडिलांनी केला आहे. सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मुलीच्या माहेरच्यांनी घेतली आहे. बीड जिल्हा रुग्णालय परिसरात मुलीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती, तर आईने मुलीचा मृतदेह पाहून जिल्हा रुग्णालयातच आक्रोश केला. वाचा सविस्तर...
CRICKET WORLDCUP - भारताच्या ओपनिंग सामन्यापूर्वीच बुमराहची डोपिंग टेस्ट, सरावादरम्यानच घेऊन गेले वाडाचे अधिकारी
लंडन- विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साउथॅम्पटनमध्ये खेळणार आहे. त्यासाठी संघाचा कसून सराव सुरू आहे. या सरावादरम्यानच वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहला उत्तेजक चाचणीसाठी नेण्यात आले. वाचा सविस्तर...
B'day Spl: विनोदी चित्रपटांचा सम्राट अशोक सराफ, 'असा' आहे त्यांचा सिनेसृष्टीतील प्रवास
मुंबई - मराठी तसेच हिंदी चित्रपटक्षेत्रात आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अशोक सराफ यांचा आज वाढदिवस आहे. आज त्यांना ७२ वर्षे पूर्ण झाले आहेत. नाटक, चित्रपट आणि मालिका या तीनही माध्यमातून त्यांनी आपलं एक वेगळं प्रस्थ निर्माण केलं आहे. या तीनही माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्षे राज्य गाजवले आहे. जाणून घेऊयात त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासाविषयी... वाचा सविस्तर...
बातमी, सर्वांच्या आधी
https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra