महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता... बुधवारी सकाळी ९ पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर... - ETV Bharat

झारखंडमधील मॉबलिचिंगप्रकरणी राहुल गांधी यांनी निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. एसटीच्या भरतीमध्ये आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच गावाने बहिष्कार टाकल्याने एका महिलेचा गर्भपात झाल्याची घटना नांदेडमधील पिंपरी गावात घडलेली आहे. शिवाय अभिनेता सलमान खानविरोधात महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी

By

Published : Jun 26, 2019, 9:18 AM IST

'जमावाकडून एका तरुणाची हत्या होणे हा मानवतेवरील कंलक'; राहुल गांधी यांचे ट्विट

नवी दिल्ली - मोटारसायकलची चोरी केल्याच्या आरोपावरून झारखंडमधील तबरेज अन्सारी या बावीस वर्षीय तरुणाची जमावाकडून मारहाण करुन हत्या करण्यात आली आहे. या मारहाणीत तरुणाचा रविवारी रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी निषेध व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर...

गावच्या बहिष्काराने 'मरणयातना'.. वाहनात कोणी घेईना, 6 किलोमीटर चालत गेल्यानं महिलेचा गर्भपात

नांदेड- गावाने बहिष्कार टाकल्यामुळे एका गर्भवती महिलेचा गर्भपात झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज एकविसाव्या शतकातही बहिष्काराची जीवघेणी परंपरा सुरू आहे. जिल्ह्यातील महिपाल पिंपरी या गावात लोकांनी पारधी कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे. या कुटुंबातील महिलेच्या पोटात दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात नेणे गरजेचे होते. यासाठी महिलेच्या कुटुंबातील लोकांनी प्रवासी वाहतूक करणारे वाहन भाड्याने मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, कोणता वाहन चालक आला नाही. गावकर्‍यांच्या सांगण्यावरून वाहनधारकांनी त्यांचे भाडे घेणे टाळले. वाचा सविस्तर...

शेतकऱ्यांसाठी खूशखबर : 'कर्जमुक्तीची व्याप्ती वाढवणार, करणार मोठी घोषणा . . . .'

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून अनेक कर्जबाजारी शेतकरी वंचित आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आगामी महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. त्याचबरोबर अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक ३६ महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वाचा सविस्तर...

एसटीच्या भरतीमध्ये आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य

मुंबई- दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यातील ४ हजार ४१६ तसेच कोकणातील जिल्हे वगळता इतर ९ जिल्ह्यातील ३ हजार ६०६ अशा एकूण राज्य परिवहन महामंडळामध्ये ८ हजार २२ चालक आणि वाहकांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीमध्ये दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील उमेदवारांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती परिवहन मंत्री रावते यांनी विधानसभेत दिली. वाचा सविस्तर...

अभिनेता सलमान खान विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या विरोधात महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक पांडे यांनी ही तक्रार दाखल केली होती.वाचा सविस्तर...


*बातमी, सर्वांच्या आधी*

https://www.etvbharat.com/marathi/maharashtra

ABOUT THE AUTHOR

...view details