महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fadnavis Met Governor : महिला लोकप्रिनिधींच्या पाठोपाठ फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट - शिंदे गटाच्या नेत्याकडून महिलांबद्दल अपशब्द

सत्तेतील राजकीय नेत्यांकडून महिलांबाबत आक्षेपार्ह विधानं ( Offensive statements by leaders about women ) केली जात आहेत. याबाबत महिला आमदार, खासदारांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट ( Women MLAs met the Governor ) घेतली. तसेच महिला लोकप्रिनिधींच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट ( Devendra Fadnavis met Governor ) घेतली.

Fadnavis Met Governor
फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट

By

Published : Nov 14, 2022, 4:57 PM IST

मुंबई -राज्यात शिंदे - फडणवीस सरकारच्या ( Shinde Fadnavis Govt ) काळात सतत केल्या जाणाऱ्या महिलांच्या अपमानाबाबत महिला आमदार, खासदारांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट ( Women MLAs met the Governor ) घेतल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राज्यपालांची भेट ( Devendra Fadnavis met Governor ) घेतली आहे. फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. राज्यातील नेत्यांच्या बेताल विधानाबाबत यावेळी चर्चा करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे.

महिलांच्या सततच्या अपमानाबाबत भेट -गेल्या काही दिवसांपासून सत्तेतील राजकीय नेत्यांकडून महिलांबाबत आक्षेपार्ह विधानं ( Offensive statements by leaders about women ) केली जात आहेत. विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या गटात असलेल्या नेत्यांकडून महिलांविषयी अपशब्द ( Slander about women by Shinde faction leader ) वापरले जात आहेत, त्यामुळे महिलांचा अपमान होत आहे. तसेच गृहखात्याकडून अशा नेत्यांना समज देण्याऐवजी एकप्रकारे बळच दिलं जात असल्याने महिला नेत्यांमध्ये अस्वस्थतेची भावना निर्माण झाली आहे. आज विरोधी पक्षातील महिला आमदार, खासदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ही भावना बोलून दाखवतानाच गृहखात्यावर नाराजी व्यक्त केली. या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर अवघ्या काही अवधीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

सत्तेतील नेत्यांचीच महिलांविरोधात विधाने -महिला खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. त्यामध्ये खासदार फौजिया खान, खासदार जया बच्चन, खासदार प्रियांका चतुर्वेदी, खासदार वंदना चव्हाण, आमदार मनिषा कायंदे, आमदार अदिती तटकरे, विद्या चव्हाण, आमदार ऋतुजा लटके आदी उपस्थित होते. यावेळी या महिला नेत्यांनी राज्यपालांकडे गृहखात्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जातं. राज्यातील सत्तेतीलच नेते महिलांविरोधात विधाने करत आहेत. अश्लील टिप्पणी केली जात आहे. त्यांना सरकारकडून साधी समज दिली जात नाही. गृहखात्याकडूनही या नेत्यांना समज दिली जात नसल्याचं या महिला नेत्यांनी राज्यपालांना सांगितल आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरही या महिला नेत्यांनी राज्यपालांकडे नाराजी व्यक्त केली आहे. आव्हाडांवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व राजकीय हेतूने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून विरोधकांना टार्गेट केलं जात असल्याचंही या महिला नेत्यांनी राज्यपालांना सांगितलं.

नेत्यांच्या बेताल विधाना संदर्भात चर्चा - राज्यपालांची भेट घेतल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर दाखल झाले. फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. राज्यातील नेत्यांच्या बेताल विधाना संदर्भात यावेळी चर्चा करण्यात झाल्याचं सांगितलं जातं. राज्यपालांकडून यावेळी फडणवीस यांना काही सूचना करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details