माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : राज्य सरकार केवळ जनतेला गाजरचा हलवा दाखवत आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारने नवीन काही दिले नाही अशी टिका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या सरकारने जनतेला गाजराचा हलवा तरी दिला. महाविकास आघाडी सरकारने तेही दिले नव्हते असे म्हणत ठाकरे यांच्या टिकेला प्रतिउत्तर दिले आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षात असे बजेट कोणीही सादर केलेले नाही. या अर्थसंकल्पात कोणतेही आकडे फुगवून दाखवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलेला नाही असही शिंदे यावेळी म्हणाले आहेत. राज्यातील जनतेच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे हे या अर्थसंकल्पातून प्रसिद्ध होते असही शिंदे म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.
अर्थसंकल बाबत विरोधकांकडे उत्तरच नाही :राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातून राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. विरोधकांनी कल्पनाही केली नसेल असा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांकडून सादर करण्यात आल आहे. अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधकांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते असा टोलाही शिंदे यांनी यावेळी लगावला आहे. तसेच, या अर्थसंकल्पाबाबत विरोधकांकडे उत्तरच उरलं नसल्याचही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.
विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम : नवीन महामंडळ काढून सर्व जातींना न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. हीच पोटदुखी विरोधकांची आहे. अर्थसंकल्प सादर करून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी काढला आहे. हे बजेट अभ्यासपूर्ण असून राज्याच्या विकासाला गती देणार बजेट आहे. यामध्ये कष्टकरी, विद्यार्थी, शेतकरी, सामान्य नागरिक अशा सर्वांना या अर्थसंकल्पातून न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे असा दावाही त्यांनी केला आहे.
लेक लाडकी एक चांगली योजना : या अर्थसंकल्पात 14 दुष्काळी जिल्हे आहेत. या दुष्काळी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना प्रत्येकी अठराशे रुपयाची मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. हा आतापर्यंतचा सर्वात ऐतिहासिक निर्णय असल्यासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच, लेक लाडकी या योजनेतून मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या उज्वल भविष्यासाठी राज्य सरकारने एक चांगली योजना सुरू केली आहे. या योजनेला महिला वर्गातून चांगला प्रतिसाद मिळाला असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा :Raj Thackeray : हे मळभ नक्की दूर होईल! सत्ता येणार; राज ठाकरेंचा आत्मविश्वास