महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात लवकरच निवडणुका होणार; काँग्रेस विधिमंडळ पक्षाची विधानभवनात बैठक - Congress Legislature Party Meeting

महाराष्ट्रातील राजकीय स्थिती चिंताजनक आहे. राष्ट्रवादी सोडून शिंदे गटात गेलेले आमदार अपात्र ठरतील. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करून निवडणुका घ्याव्या लागतील, असे मत काँग्रेसचे प्रदेश प्रभारी एच के पाटील यांनी व्यक्त केले आहे, ते आज मुंबईत बोलत होते.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाची विधानभवनात बैठक
काँग्रेस विधिमंडळ पक्षाची विधानभवनात बैठक

By

Published : Jul 4, 2023, 4:11 PM IST

Updated : Jul 4, 2023, 4:21 PM IST

काँग्रेस विधिमंडळ पक्षाची विधानभवनात बैठक

मुंबई :महाराष्ट्रमध्ये निर्माण झालेल्या राजकीय गोंधळाच्या वातावरणात काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज विधानभवनात पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सर्वजणांनी उपस्थिती दर्शवली.

काँग्रेसच्या आमदारांचा प्रामाणिकपणा :भारतीय जनता पक्षाच्या वतीने अन्य पक्षाच्या आमदारांना आमिषे दाखवली जात आहेत. त्यांच्यावर विविध यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणला जातो आहे. यातूनच आधी भाजपने शिवसेना फोडली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष फोडला. विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने खालच्या पातळीचे राजकारण केले, मात्र काँग्रेसच्या आमदारांना आमिषेक दाखवण्यात आल्यानंतरही त्यांनी पक्षासोबत प्रामाणिकपणा दाखवत, कुठलेही गैरकृत्य केले नाही. याचा पक्षाला अभिमान असल्याचे प्रभारी एचके पाटील म्हणाले. तसेच महाविकास आघाडीवर आपला अजूनही विश्वास असून महाआघाडीच्या माध्यमातून आपण या शक्तींना नक्कीच टक्कर देऊ असेही ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात लवकरच निवडणुका :आजच्या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या संदर्भामध्ये आम्ही सविस्तर चर्चा केली आहे. पक्ष अधिक मजबुतीने वाढवण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार फुटून सत्ताधारी पक्षात सामील झाले आहेत. दोन तृतीयांश आमदार फुटल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात तशी परिस्थिती दिसत नाही. त्यामुळे या आमदारांवर निश्चितच अपात्रतेची कारवाई होईल, ती व्हायलाच हवी. त्याचप्रमाणे शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदारांवर ही अपात्रतेची कारवाई होऊ शकते. त्यामुळे या कारवाईनंतर निश्चितच सर्वोच्च न्यायालयाला राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी हस्तक्षेप करावा लागेल. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच निवडणुका होण्याची चिन्हे आहेत, असेही एचके पाटील यावेळी म्हणाले.

विरोधी पक्षनेता बाबत अद्याप विचार नाही :राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ आता कमी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास विरोधी पक्ष नेते पदावर काँग्रेस दावा करणार का? असा प्रश्न विचारला असता एचके पाटील म्हणाले की, सध्या आमच्यापुढे हा प्रश्नच नाही. या अस्थिर राजकीय वातावरणामध्ये आपला पक्ष मजबुतीने एकत्र बांधून तो अधिक वाढवणे, हा आमच्या पुढचा प्रश्न आहे. विरोधी पक्ष नेते पदाबाबत ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळी आम्ही निर्णय घेऊ. सध्या याबाबत कुठलाही विचार केला गेला नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. या बैठकीला काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे आमदार उपस्थित होते.

हेही वाचा -Maharashtra Political Crisis Update : बहुसंख्य राष्ट्रवादीचे आमदार माझ्यासोबत - अजित पवार

Last Updated : Jul 4, 2023, 4:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details