मुंबई -लहान मुलांवर वैद्यकीय उपचार करणारे वाडिया रुग्णालय सुरु राहण्याच्या दृष्टीने काल(14 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन मध्यस्थी केली. हे रुग्णालय आता नेहमीप्रमाणे रुग्णांच्या सेवेत राहणार आहे.
गोरगरीबांना आरोग्याच्या सुविधा स्वस्तात देणारे वाडिया रुग्णालय बंद व्हायला नको, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. रुग्णालय सुरू रहावे यासाठी महापालिका आणि राज्य शासन आवश्यक तो निधी वाडिया रुग्णालयाला उपलब्ध करून देणार आहेत. इतर मुद्द्यांवर येत्या १० दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहेत. दरम्यान, रुग्णालय सुरु रहावे आणि कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या आबाधीत रहाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.