मुंबई: शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या सर्वत्र याच गोष्टीची चर्चा सुरु आहे. शिवाय लोकांमध्ये देखील यावर अनेक चर्चा सुरु आहेत. दोन हजार रुपये नोटांची छपाई यापूर्वीच बंद करण्यात आली आहे. क्लीन नोटा धोरणानुसार हा निर्णय घेतल्याचा बोलला जात आहे.
सोन्याची खरेदी का?: मुंबई सोनेचांदी व्यापारी संघटनेचे कुमार जैन यांनी सांगितले की, सरकारने तुम्हला चार महिने वेळ दोन हजाराच्या नोटा बदलू घेण्यासाठी दिला आहे. ज्यांच्याकडे 2000 च्या जास्त नोटा आहेत ते लोक सोने खरेदीला पसंती देत आहेत. याचे कारण असे की, जर त्या नोटा बदलण्यासाठी बँकेत गेलो तर बँकेकडून अनेक प्रश्न विचारले जातात. वार्षिक कमाई बँक विचारू शकते आणि त्याबाबत कर देखील भरलाय की, नाही हा प्रश्न उपस्थित होऊ शकते. त्यामुळे सर्वात सोपा पर्याय असल्याने, ग्राहक सोने खरेदीला महत्व देत आहे. सोनू विकणे देखील अगदी सोपे आहे. शनिवार सकाळ पासून सोने चांदी खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढत आहे. जेव्हा 2016 साली पहिली नोटबंदी झाली होती, तेव्हा सोनाचे दर हे तीस हजार वरून पन्नास हजारापर्यंत पोचले होते.