मुंबई - मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभाग भोंगळ कारभारामुळे नेहमीच चर्चेत असतो. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. विधी व इतर शाखेच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊन तीन वर्षे झाली आहेत. मात्र, अजूनही परीक्षा विभागाने तब्बल साडेतीन वर्षे त्यांची गुणपत्रिका दिलेली नाही.
हेही वाचा -विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप : फायनलमध्ये प्रवेश करणारा अमित पांघल ठरला पहिलाच भारतीय खेळाडू
विधी, मीडिया स्टडीज व एमसीए अभ्यासक्रमाची परीक्षा काही विद्यार्थ्यांनी तर काहींनी ऑक्टोबर २०१४ मध्ये दिली होती. त्यामध्ये एका विषयात अनुत्तीर्ण झाल्यामुळे या विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज केला असता, पुनर्मुल्यांकनात विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र, तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना गुणपत्रक मिळाले नाही. गुणपत्रक मिळावे यासाठी विद्यार्थी वारंवार विनंती करत आहेत. मात्र, परिक्षा विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. म्हणून या महिन्यात हे प्रकरण मिटवले नाही तर विद्यार्थी संघटना आक्रमक होत आपला निर्णय घेतील, असे विद्यार्थी भगवान बोयल याने सांगितले.