मुंबई -शेअर बाजारात सोमवारी झालेल्या पडझडीनंतर बीएसई सेन्सेक्स 52400 आणि निफ्टी 15800 पॉइंट्सच्या वर बंद झाला. आज (मंगळवारी) 15 जूनला सिंगापूरचे एसजीएक्स निफ्टी सिंगापूर एक्सचेंजमध्ये 0.09 टक्क्यांनी घसरला. तर भारतीय शेअर बाजारात आज सुरूवातीच्या व्यापारात बीएसई सेन्सेक्स 0.41 टक्क्यांनी वधारून 216.96 अंकांच्या वाढीसह 52,768.49 अंकांवर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी 50देखील 0.32 टक्क्यांनी म्हणजे 57.30 अंकांच्या वाढीसह 15,869.15 अंकांवर आहे. आजच्या व्यापारात गुंतवणूकदारांचे लक्ष अदानी ग्रुप स्टॉक्स, कोल इंडिया, भारती एअरटेल, पीएनबी हाऊसिंग आणि ज्युबिलंट फूडवर्क्सवर असेल.
देशांतर्गत निर्देशांकांवर आशियाई बाजारात संमिश्र ट्रेंड आहे. जपानच्या निक्केई 225 मध्ये 0.66 टक्क्यांनी, सिंगापूरचे स्ट्रेट टाईम्स 0.57 टक्क्यांनी आणि तैवानचे मार्केट 0. 53 टक्क्यांनी वाढले, तर हाँगकाँगच्या हँग सेन्ग 0.51 टक्क्यांनी खाली, दक्षिण कोरियाच्या कोस्पीमध्ये 0.13 टक्के आणि शांघाय कंपोजिटमध्ये 0.34 टक्क्यांनी घसरण झाली.
हेही वाचा -आजपर्यंत सर्वच राज्यकर्त्यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले - अजित पवार