महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Prakash ambedkar : शिंदेंनी भाजपची साथ सोडली, तर विचार करू - प्रकाश आंबेडकर - महाराष्ट्र विकास आघाडी

एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात गुप्त बैठक झाली. इंदु मिल मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या संदर्भात ही बैठक झाली. शिंदेंनी भाजपची साथ सोडली, तर युतीचा विचार करू असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली आहे.

Prakash ambedkar and eknath shinde
प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदे

By

Published : Jan 12, 2023, 2:39 PM IST

मुंबई :महाराष्ट्र विकास आघाडीच्यावतीने व बहुजन आघाडीला सामावून घेण्यास प्रतिसाद ठोस मिळत नाही. बहुतेक वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल गुप्त खलबत झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपसोबत वंचित कधी गेला नाही आणि जाणारही नाही. पक्षाची भूमिका बदलेली नाही, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली आहे.

आम्ही एकमेकांना युतीची बांधिलकी दिली : आंबेडकर पुढे म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आमचा खिमा केला. उद्धव ठाकरेंना फायनल करायचे असेल तर ते त्यांच्या हातात आहे. सेनेबरोबर युती करण्यास आम्ही तयार, फायनल कधी करायचे हे उद्धव यांनी ठरवावे. आम्ही एकमेकांना युतीची बांधिलकी दिली आहे. पण ती सार्वजनिक झालेली नाही. महापालिका निवडणुका आणि विधान परिषदेत बहुजन समाजाची मते मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळेच शिवसेनेनेही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या युतीला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, आता शिंदे-आंबेडकर यांच्या भेटीने या युतीला सुरुंग लागणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

महाविकास आघाडी अद्यापही ठोस निर्णय करत नाही :वंचित बहुजन आघाडी संदर्भात महाविकास आघाडी अद्यापही ठोस निर्णय करत नाही. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत अत्यंत चांगली चर्चा युती संदर्भात झालेली आहे. त्यांची युती होणार असल्याचे देखील सार्वजनिक कार्यक्रमातून स्वतः प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेला आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये सामावून घेण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघांकडून अनुकूलता परिणामकारकरीत्या प्राप्त झालेले नाही.


वंचित बहुजन आघाडीला आता महाराष्ट्र विकास आघाडीचा मार्ग मोकळा : प्रकाश आंबेडकर हे भाजपसोबत जाणार नाहीत. त्यामुळे त्यांनी शिंदे यांच्यासोबत यावं म्हणून प्रयत्न केले जात आहेत. काल मध्यरात्रीच्या भेटीत याच विषयावर चर्चा झाल्याचं सांगितले जाते. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आता काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात सार्वजनिक कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडी बाबत महाराष्ट्र विकास आघाडी मध्ये येण्याला अडचण नाही, अशा आशयाचे विधान केल्याचे प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या या विधानानंतर वंचित बहुजन आघाडीला आता महाराष्ट्र विकास आघाडीचा मार्ग मोकळा होत असल्याचे संकेत मिळाले होते.

हेही वाचा : ​​मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् प्रकाश आंबेडकरांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

शिवसेनेसोबत वंचित बहुजन आघाडीचा युतीचा प्रयत्न :वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी सामावून घेत नाही. ही बाब प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवली होती शिवसेनेसोबत वंचित बहुजन आघाडीचा युतीचा प्रयत्न अत्यंत शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. त्यांची युती होईल अशी मात्र महाविकास आघाडी कडून कोणतेही ठोस धोरणात्मक निर्णय न आल्याने बहुतेक प्रकाश आंबेडकर यांनी आणि एकनाथ शिंदे यांची ही भेट झाल्याचे सूत्रांकडून समजते.

भेटीमुळे अनेक चर्चांना तोंड फुटलेले आहे :एकीकडे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर यांच्या युतीच्या चर्चाही झाल्या आणि त्याबाबत ती प्रक्रिया गतिमान आहे याबाबत वंचित नेत्या रेखा ठाकूर यांनी म्हटले आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीने अद्यापही प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात अनुकूलता जाहीर केलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या या भेटीमुळे अनेक चर्चांना तोंड फुटलेले आहे.

इंदू मिल मधील स्मारक संदर्भात भेट :मागील दोन महिन्यात देखील प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. मात्र ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल मधील स्मारक संदर्भात ती भेट असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी त्यानंतर सांगितले होते. मात्र वंचित बहुजन आघाडी मधील तमाम आंबेडकरी जनतेला भाजपसोबत गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत ही बैठक आणि युती झाली तर कितपत आवडेल आणि पचेल याबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्याचे कारण वंचित बहुजन आघाडी मध्ये अनेक ओबीसी जाती मायक्रो ओबीसी उपस्थित यांचा समावेश आहे आणि अनेक मतदारसंघांमध्ये त्यांची लढत भाजप यांच्यासोबत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details