महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

AAP : राष्ट्रीय पक्षाची मान्यता भेटल्यानंतर आता आम आदमी पक्षाची स्वारी महाराष्ट्रावर... - AAP

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम आदमी पार्टीला ( Aam Aadmi Party ) देशातील ९ व्या क्रमांचा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. दिल्ली तसेच पंजाब राज्य व देशातील मुंबई खालोखाल असलेली २ऱ्या क्रमांकाची "दिल्ली महानगर पालिका" निवडणुकीत पार्टीने जगातल्या सर्वात मोठ्या भारतीय जनता पक्षाच्या १५ वर्षांच्या राजवटीला मोडीत काढून संपूर्ण बहुमताने सत्ता स्थापना केली आहे. आता महाराष्ट्रातील सत्तेत महत्त्वाचा वाटा उचलण्यासाठी आप कडून पूर्ण प्रयत्न केले जाणार असल्याचे आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.

AAP
अरविंद केजरीवाल

By

Published : Dec 10, 2022, 10:51 PM IST

Updated : Dec 10, 2022, 11:04 PM IST

आम आदमी पक्षाचे नेते प्रतिक्रिया व्यक्त करताना

मुंबई : गुजरात निवडणुकीतील निकालानंतर आता आम आदमी पक्षाला ( Aam Aadmi Party ) राष्ट्रीय पक्षाची मान्यता भेटल्याने आपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह जोमात आहे. अशातच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ढवळून निघाल्या कारणाने आता महाराष्ट्रातील सत्तेत महत्त्वाचा वाटा उचलण्यासाठी आप पूर्ण प्रयत्न करत आहे. अशामध्ये मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत, विधानसभा अथवा लोकसभा आता पूर्णपणे ताकदीनिशी महाराष्ट्रात आप झाडू फिरऊ इच्छित आहे.

आपची वाटचाल: भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनानंतर संविधान स्थापना दिवस दिनांक २६ नोव्हेंबर २०१२ रोजी स्थापना झालेल्या आम आदमी पार्टीने नुकतीच १० वर्ष पूर्ण केली आहेत. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम आदमी पार्टीला देशातील ९ व्या क्रमांचा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली असून देशाच्या विविध राज्यात पक्षाचे स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, राज्यसभा या विविध पातळ्यांवर १५०० पेक्षा जास्त लोकप्रतिनिधी आहेत. दिल्ली तसेच पंजाब राज्य व देशातील मुंबई खालोखाल असलेली २ऱ्या क्रमांकाची "दिल्ली महानगर पालिका" निवडणुकीत पार्टीने जगातल्या सर्वात मोठ्या भारतीय जनता पक्षाच्या १५ वर्षांच्या राजवटीला मोडीत काढून संपूर्ण बहुमताने सत्ता स्थापना केली आहे. आज पक्षाचे १० राज्यसभा खासदार, दिल्ली, पंजाब, गोवा व गुजरात या राज्यांत प्रत्येकी अनुक्रमे ६२, ९२, २ व ५ असे मिळून एकूण १६१ आमदार आहेत. एवढ्या कमी कालावधीत एवढं यश मिळणे हा जागतिक इतिहास आहे.



अल्पावधीतच पक्षाची मोठी मजल: राज्यात झालेल्या नाट्यमय सत्तांतरानंतर शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्वात आले व राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलून गेली. अशातच या बदललेल्या समीकरणाचा फायदा कशा पद्धतीने घेता येईल, यासाठी सर्वच राजकीय पक्षांची चाचपणी सुरू असताना आत्ताच गुजरात विधानसभेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्षाची मान्यता लाभलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाने सुद्धा महाराष्ट्रात आपली झाडू फिरवण्याचं निश्चित केलं असून येणाऱ्या मुंबई महानगरपालिकासह राज्यातील २३ महानगरपालिकांमध्ये ते ताकतीने त्यांचे उमेदवार उभे करणार आहेत. २०१२ साली अस्तित्वात आलेल्या या पक्षाने अल्पावधीतच मोठी मजल मारली आहे. दिल्ली, पंजाब या राज्यात सत्ता काबीज करण्याबरोबरच गुजरात मध्ये सुद्धा ५ आमदार निवडून आणण्याची किमया केली आहे. गोव्यातही २ आमदार निवडून आले आहेत. आप ची राजकीय गणिते पहिल्यापासून वेगळी राहिलेली आहेत. जनसामान्यांचे प्रश्न घेऊन ते नेहमीच निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. अशातच २०२१ मध्ये राज्यात झालेल्या विविध ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाने राज्यात ३०० उमेदवार ठीक ठिकाणी उभे केले होते त्यापैकी १४५ उमेदवार निवडून आले हे काही थोडके नाही.

महाराष्ट्रात सर्व निवडणुका लढवणार: या विषयी बोलताना आप पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या व मुंबई अध्यक्ष, प्रीती मेनन म्हणाल्या की, आम आदमी पक्ष पुढच्या काळात महाराष्ट्रात सर्व निवडणुका लढवणार आहे. आम्ही महाराष्ट्रात कुठेही जातो तिथे मोठ्या प्रमाणात पक्षात लोकांचा सहभाग होत आहे. माजी खासदार हरीभाऊ राठोड असतील तसेच धनराज वंजारी हे सुद्धा पक्षात सामील झाले आहेत. २०१४ मध्ये महाराष्ट्रात आम्ही लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्या नंतर कुठलीही निवडणूक लढविली नाही. परंतु ग्रामीण स्तरावर आमच्या १० ते १५ ग्रामपंचायती आहेत व अनेक ग्राम सदस्य सुद्धा आहेत. तर पुढच्या ज्याकाही स्थानिक तालुका व जिल्हा स्तरावर निवडणुका येतील त्यात आम्हाला नक्की यश येईल व त्या अनुषंगाने आम्ही विधानसभा व लोकसभेची तयारी सुरू करू. सर्वात महत्त्वाची आहे ती, मुंबईची निवडणूक. २०१४ ला आम्हाला २.७ लाख मते भेटली होती. इथे मुंबईकर सांगतात की, "मुंबई मे भी हमे केजरीवाल चाहिए". त्या अनुषंगाने आमची पूर्ण तयारी झाली आहे. निवडणुका घोषित झाल्या की, आम्ही मुंबईतील सर्व जागा लढवणार व आम्ही जिंकणार, असा विश्वास प्रीती मेनन यांनी व्यक्त केला आहे.



दिल्ली मॉडेलचे यश:अल्पावधीत नावलौकिक कमावलेल्या आप पक्षाविषयी बोलताना, मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार, आशीष शेलार म्हणतात की, "मुंबई महानगर पालिका निवडणुकीत आमचा खरा प्रतिस्पर्धी हा आप पक्ष असणार आहे". अर्थात त्यांच्या या वाक्यात बरच काही दडलेले आहे. कारण ज्या पद्धतीने मुंबई पालिकेतील एका मागोमाग एक भ्रष्टाचार उघडकीस येत आहेत. शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून ज्या पद्धतीने राज्यात नाट्यमय घडामोडी सुरू आहेत ते पाहता जनतेचा कौल हा आप च्या बाजूने झुकताना दिसू शकतो. विशेष म्हणजे दिल्लीत महानगर पालिका निवडणुकीत जो चमत्कार आप पक्षाने करून दाखवला त्या पद्धतीचा चमत्कार मुंबईत करण्याची केजरीवाल व त्याच्या पूर्ण टीमची तयारी आहे. म्हणूनच मुंबई महानगर पालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना आप इतरांचा सुपडा साफ करण्यासाठी कशा पद्धतीची झाडू फिरवतो हे बघणे गरजेचे आहे. कारण सुरुवात मुंबईतून होणार आहे. पक्षाची ही प्रगती म्हणजे २०१५ सालापासून तयार केल्या गेलेल्या दिल्ली राज्याच्या विकासाच्या "दिल्ली मोडेल"चे यश असल्याचे आपचे प्रवक्ते धनंजय शिंदे सांगतात.

Last Updated : Dec 10, 2022, 11:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details